30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home नांदेड आईच्या निधनानंतर मुलानेही प्राण सोडले

आईच्या निधनानंतर मुलानेही प्राण सोडले

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : आईने जगाचा निरोप घेतला अशी बातमी मुलाला समजताच हा आघात सहन न झाल्याने मुलाचाही हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुखद घटना कुंडलवाडी शहरातील वंजार गल्ली घडली. या घटनेची शहरात माहिती पसरताच अनेकांनी दुख: व्यक्त केले आहे. कुंडलवाडी शहरातील वंजारी समाजातील ज्येष्ठ महिला बुधाबाई चिन्नोजी गंगोणे ( वय१०५र् ) यांचे दि.२३जानेवारी रोजी सांयकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

आईच्या निधनाची बातमी कळताच मुलगा अशोक चिन्नोजी गंगोणे ( वय७५) यांना दु:ख सहन न झाल्याने अवघ्या तीन तासानंतर आई पाठोपाठ मुलाचे निधन झाले.आई व मुलावर नागणी रोडवरील स्मशानभूमीत दि .२४ जानेवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे गंगोणे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच वंजारी समाज व कुंडलवाडी शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

उजाडू दे आता ग्रामविकासाची पहाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या