31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडपुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्णांची भर : तेरा रुग्ण गंभीर

पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्णांची भर : तेरा रुग्ण गंभीर

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रयोगशाळेकडून बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकुण ८७ अहवाल प्राप्त झाले आहेत़यात ५६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर सकाळी नव्या चार रूग्णांची भर पडून १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे नांदेडची रूग्ण संख्या ३९१ वर गेली असून १३ जणांची प्रकृती गंभीर बनली आहे.

कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ७ बाधित व्यक्ती, मुखेड कोविड केअर सेंटर येथील १ बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भित झालेला १ बाधित व्यक्ते असे एकुण ९ बाधित व्यक्ती बरे झाल्याने बुधवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. बाधितांपैकी एकुण २९२ व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील ८२ बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर १७ व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बाधितांमध्ये बाफना परिसरातील २८ व ६४ वषार्चे २ पुरुष, आंबेडकर नगर येथील ५ वर्षाची बालिका व ३३ वर्षाचा १ पुरुष, आसर्जन येथील ४ बाधित व्यक्तींपैकी १०, ११ व ३७ वर्षाच्या ३ महिला, ४२ वषार्चा १ पुरुष, विनायकनगर येथील ३४ वषार्ची १ महिला, वसंतनगर येथील ५२ वर्षार्ची १ महिला, गाडीपुरा येथील ५४ वर्षाची १ महिला, आनंदनगर परिसरातील ३६ वर्ष १ महिला, अनिकेतनगर भावसार चौक येथील ६५ वर्षची १ महिला, कंधार तालुक्यातील सोमला तांडा उमरज येथील ६५ वर्षार्ची १ महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील २० वर्षाचा १ पुरुष व ३८ वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. उपचार घेत असलेल्या ८२ बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील १३ बाधितांची (७ महिला आणि ६ पुरुष बाधित ) प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

Read More  खैरी नदीपात्रात सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या