24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeनांदेडऑल महाराष्ट्र टेन्ट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन भोकरचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

ऑल महाराष्ट्र टेन्ट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन भोकरचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

एकमत ऑनलाईन

भोकर : तालुक्यातील टेन्ट, मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हाँल, लॉन्स, कॅटरिंग,ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड लाईट डेकोरेशन आणि इतर त्यासंबंधी व्यवसाय धारकांच्या कोविड- १९ मुळे शासनाने लादलेल्या निर्बंधामुळे होणाऱ्या उपासमारीच्या विरोधात भोकर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येऊन त्यात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार भोकर यांना सादर करण्यात आले.

या मागण्यांमध्ये प्रमुख्याने सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, मंगल कार्यालय हॉलच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी ५०० आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी, या व्यवसायाशी संबंधित जीएसटी १८% च्या ऐवजी ५% टक्के करावी, टेन्ट, मंडपामध्ये होणाऱ्या विवाह समारंभावर लागणारा जीएसटी वधूपित्याला परत मिळण्याची तरतूद करावी, या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिला जावा जेणेकरून व्यवसाय चालवण्यासाठी बँकेकडून सहज कर्ज प्राप्त होऊ शकेल. यासह अनेक मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे तहसीलदार भोकर यांना देण्यात आले.

या निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जोशी, उपाध्यक्ष दिनेश लक्ष्टवार, सचिव अ.तोहिद अ.हमीद,कोषाध्यक्ष शाम पोकलवार, सहसचिव राजेश सावते, राजेश्वर जाधव, गणेश सादूलवार, बाळू वाघमारे, अमोल रावळे, राम काळे, अमोल गोनेकर आदीसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार : अमित देशमुख

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या