16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडआदीवासी भागात ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचा वानवा

आदीवासी भागात ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचा वानवा

एकमत ऑनलाईन

माहूर : माहूर , किनवट तालुक्यात अनुक्रमे ग्रामीण रुग्णालय तीन असून प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या एकंदरीत १४ एवढी असताना सर्वसामान्य रुग्णांना रुग्णवाहिकेचा लाभ मिळत नसल्यामुळे आमदारांकडे वाढत्या तक्रारींमुळे ते देखील सर्व संबंधित आरोग्य यंत्रणेवर नाराज आहेत. वाढत्या तक्रारी बघून दस्तुरखुद आ. भीमराव केराम यांनी संबंधित आरोग्य यंत्रणेला वेळेत रुग्णवाहिका मिळावी व त्यासोबतच आवश्यक तो उपचार मिळावा याकरिता पत्राद्वारे सुचित केले आहे.

लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात सर्वप्रथम आ भिमराव केराम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीचा वापर बांधकाम ठेकेदारांना देऊन न करता माहूर आणि किनवट तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल याकरिता रुग्णवाहिका खरेदी केल्या, परंतु आजमितिला आ. केराम यांच्या संकल्पनेला कुठेतरी आरोग्य यंत्रणा तडा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दृष्टिकोनातून संबंधित रुग्णांनी आमदार केराम यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केले असून निश्चितपणे या तक्रारीची दखल घेतल्या गेली तर माहूर आणि किनवट तालुक्यातील अतिदुर्ग व डोंगराळ भागात वास्तव्य करणा-या श्रमजीवी लोकांना त्यांचे आरोग्य विषयक न्याय मिळेल अशी रास्त अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकाकडून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या