25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडअमृता फडणवीस नांदेड मार्गे गंगाखेडला रवाना

अमृता फडणवीस नांदेड मार्गे गंगाखेडला रवाना

एकमत ऑनलाईन

नांदेड :ह्यापल्या रोखठोक स्वभावाने प्रसिद्ध आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचे गुरूवारी दुुपारी नांदेड विमानतळावर आगमन झाले. येथील स्वागतानंतर त्या गंगाखेड येथे आयोजित कार्यकमासाठी रवाना झाल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस या आपल्या रोखठोक स्वभावाने प्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे तर विरोधकांनी केलेल्या टिकांना सुद्धा अनेकवेळा सडेतोड उत्तरे देवून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरीत असतात. यामुळे त्या चर्चेत राहतातÞ एका कार्यकमाच्या अनुषंगाने मुंबई येथून अमृता फडणवीस यांचे गुरूवारी दुुपारी दोनच्या सुमारास खासगी विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झाले. येथे भाजपचे युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, सौ. चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, नगरसेविका वैशाली देखमुख, महादेवी मठपती, डॉ. शितल भालके, डॉ. सचिन उमरेकर, मिलींद देखमुख आदी पदाधिका-यांनी अमृता फडणवीस यांचे स्वागत केले. यानंतर त्या गंगाखेड येथे आयोजित कार्यकमासाठी रवाना झाल्या. येथील कार्यक्रमानंतर सौ. फडणवीस सायंकाळी साडे सातच्या सुमारास नांदेड विमानतळाहून पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या