27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडपशुखाद्य महागले; दुग्धव्यवसायाला घरघर!

पशुखाद्य महागले; दुग्धव्यवसायाला घरघर!

एकमत ऑनलाईन

देगलूर (नरसिंग अन्नमवार) : शेतीला जोडधंदा म्हणून असलेला दुग्ध व्यवसाय आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. पशुधनासाठी लागणारा भुसा, पेंडीच्या दरात मोठी वाढ झाल्याने पशुपालक संकटात सापडले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करावा की नको, असा प्रश्न शेतक-यांपुढे उभा ठाकला आहे.

तालुक्यातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे बी-बियाणे खतांचे दर वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील अनेक शेतक-यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी बहुतांश शेतक-यांनी बँक, सोसायटी, पतसंस्थेचे कर्ज घेऊन म्हशी, गायी खरेदी केल्या आहेत. पशुधनाच्या संरक्षणासाठी गोठेही बांधले आहेत.

नगदी उत्पन्न मिळते म्हणून शेतकरी पशुपालन करीत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. पेंड ,भुसा, सरकी या जनावरांच्या खाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पशुखाद्य महागले असले तरी दुसरीकडे दुधाचे दर मात्र जैसे थे आहेत. शिवाय पशुधनाचे दरही वाढले

असल्याने लाखो रुपये खर्चून हा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. सध्या पेंड, सरकी, मका, वाढे, कडब्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुधनाच्या चा-यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तेवढे उत्पन्न मिळेनासे झाले आहे. परिणामी दुग्ध व्यवसायाला घरघर लागली असल्याचे पहावयास मिळत आहे. दरवाढीमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे.

उत्पादनापेक्षा खर्च वाढल्यानेचिंता…
दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशुखाद्य वर अधिक खर्च होत असल्याने शेतकरीचिंताग्रस्त झाले आहेत. सध्या पशुधनाला बरोबरच पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाली आहे .त्या तुलनेत दुधाचे दर स्थिर आहेत. वाढत्या महागाईमुळे दुग्ध व्यवसायाला फटका बसत आहे .दुग्ध व्यवसाय करणा-या शेतक-याकडून पशुधनासाठी सरकी ,मका, हरभरा सुग्रासला अधिक मागणी असते .मात्र या पशुखाद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे .शासनाने पशुखाद्याचे दर कमी करून शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी दुग्ध व्यावसायिकाकडून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या