27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeनांदेडअण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सची प्रबोधन यात्रा

अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सची प्रबोधन यात्रा

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात समाज जोडो प्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात कंधार येथून ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून, या यात्रेचा समारोप ११ मार्च रोजी म्हणजे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीदिनी नायगाव येथे होणार आहे.

या यात्रेचा उद्देश म्हणून बारा कलमी कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यात मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, घटनात्मक तरतूद करून अनुसूचित जाती जमाती व ओबीसी यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय व खाजगी क्षेत्रांमध्येही आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण तात्काळ बंद करण्यात यावे व अधिकाधिक सार्वजनिक उद्योग निर्मिती करण्यात यावी, भांडवलदारांचे कर्ज माफ करर्णा­या सरकारने शेतक­-यांचे आणि मागासवर्गीय लोकांचे कर्ज देखील तात्काळ माफ करावे, चालू महागाई निर्देशांकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी, अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी आदी विषयांवर या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्ते काम करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा अरूणा बाबळे यांनी कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या