23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडमान्सूनच्या लहरीपणामुळे शेतक-यांत चिंता

मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतक-यांत चिंता

एकमत ऑनलाईन

माहूर : आज इथे तर उद्या तिथे, तर काही ठीकाणी पावसाचा पत्ता च नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त होत आहे. माहूर तालुक्यातील बहुतांश शेतक-यांची पेरणी आटोपली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच काही शेतकर्‍यानी धूळ पेरणी केली आहे. पण हवा तसा पाऊस पडत नाही.माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात सहा ते सात वेळा चांगल्या पावसाने हजेरी लावली,परंतु दोन तीन किलोमीटर अंतरावर काहीच पाऊस नाही असा काहीसा प्रकार सुरु आहे.

माहूर तालुक्याच्या काही ठीकाणी धुवांधार पाऊस पडला असल्याने त्या भागातील नाल्यांना पूर देखील आला आहे. हे विशेष. आजही तालुक्यात काही ठीकाणी शेतात ओल कायम असून, तर कोठे कोठे पेरलेल्या बियाण्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील वर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात पिकांसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडल्याने पेरण्या साधल्या होत्या. पण त्या नंतर मोठया प्रमाणावर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र यावेळी पाऊस सर्व ठीकाणी पडत नसल्याने तुटक पडणारा पाऊस मान्सूनपूर्व की मान्सूनचा असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला असून चिंताग्रस्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या