27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeनांदेडएपीएल, शेतकरी मोफत धान्यापासून वंचित

एपीएल, शेतकरी मोफत धान्यापासून वंचित

एकमत ऑनलाईन

कंधार : केंद्र शासनाने अंतोदय व प्राधान्य रेशनकार्ड धारकांना जानेवारीपासून मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांनी दिली आहे.

केंद्र शासनाने गरीब कुटुंबातील अंतोदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिका लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून एक रुपया ही न घेता सर्व धान्य मोफत वाटप करण्याचे केंद्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे तर एपीएल व शेतकरी कार्ड धारकांना मोफत धान्यापासून वंचित ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. कंधार तालुक्यातील प्राधान्य रेशनकार्ड धारक संख्या ३७ हजार १४९ असून त्यांची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ३२ एवढी आहे. यात अंतोदय कार्ड धारक लाभार्थी संख्या ३ हजार १४१, त्यांची लोकसंख्या १४ हजार ६३९ इतकी असल्याची माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांनी दिली आहे.

सदरच्या लाभधारक शिधापत्रिका धारकांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत स्वस्त धान्य दुकानामार्फत मोफत धान्य मिळणार आहे. यात केवळ दोन योजनेतीलच लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. तर शेतकरी, एपीएल कार्ड धारकांना शासनाकडून कोणतेही मोफत धान्य मिळणार नसुन त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही. या महिन्यापासून शहर व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना वरील दोन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धान्य स्वस्त धान्य दुकानातून मोफत मिळणार असून, अश्या कार्ड धारकांनी एकही रुपया न खर्च करता मोफत धान्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनुपसिंह यादव व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या