26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या!

डायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या!

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोविड लसींच्या तुटवड्यामुळे सध्या ४५ पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे.परंतू शहरातील काही लसीकरण केंद्रावर डायरेक्ट लग्गा लावा अन् कोविडची लस घ्या अशा प्रकार होत आहे.यामुळे भल्या पहाटेपासून लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांची फरफट होत असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी लावलेल्या नियोजनास कर्मचा-यांकडून सुरूंग लावला जात आहे.

प्रारंभी कोविड लस घेण्याकडे पाठ फिरवणा-या नागरिकांची कोरोनाची दुसरी लाट तीव्र होताच लस घेण्यासाठी धावपळ होत आहे. परंतू मागणी पेक्षा कमी लसीचा पुरवठा होत असल्याने कोविड लसीचा गेल्या काही दिवसापासून प्रचंड तुटवडा भासत आहे.त्यामुळे शासनाकडून १८ ते ४४ वयोगटीची लसीकरण मोहिम तुर्त पुढे ढकलण्यात आली आहे.आता केवळ ४५ पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या नागरिकांना कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला जात आहे.

यात नांदेड शहरातील मनपा क्षेत्रात मोडणा-या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुवेर्दीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या ८ केंद्रावर आणि जिल्ह्यातील एकुण ९२ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मनपा क्षेत्रात स्त्री रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन तर शहरी क्षेत्रात मोडणारे सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा एकुण १६ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन ही लस आणि ग्रामीण क्षेत्रात मोडणा-या एकुण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड ही लस मिळत आहे.

दर दिवशी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी १०० डोस उपलब्ध होत आहेत. यामुळे जेष्ट नागरिकांसह महिला,पुरूषांच्या भल्या पहाटेपासून शहरातील लसीकरण केंद्रावर रांगा लागत आहेत.यात चार ते पाच तास रांगेत थांबुनही लस मिळेल की नाही याची विश्वास राहिला नाही.परंतू दुसरीकडे शासनगर स्त्री रूग्णालय,शिवाजी नगर,जंगमवाडी,कौठा,शासकीय रूग्णालय येथे लग्गेबाजीने कोविड लस मिळत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. डायरेक्ट लग्गा लावा अन् कोविड लस घ्या असा अनुभव येत असल्याने जेष्ट नागरिकांची फरफट होत आहे.रविवारी शिवाजीनगर केंद्रावर एका वृत्तपत्र विके्रत्याला अनुभव आला.

तर सोमवारी शामनगर येथील केंद्रावर आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून लसीसाठी दबाव आणला जात असल्याचा मॅसेज सोशल मिडीयावरून फिरत होताक़ाही मोजक्या केंद्रावरील कर्मचा-यांकडून नागरिकांना अशी भेदभाव पुर्ण वागणूक मिळत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या जिल्हयातील कोविड लसीकरणाच्या नियोजनास सुरूंग लावले जात आहे.याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनीच घ्यावी अशी मागणी होत आहे.

गुरुगोविंदसिंगजी रुग्णालयात तुघलकी कारभार
आधीच लस मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक रुग्णालयातील अधिका-यांच्या मनमर्जीप्रमाणे नियम बदलले जात आहेत. अधिका-यांच्या तुघलकी कारभाराने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे.

चक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या