16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडभूमी अभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभार

भूमी अभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभार

एकमत ऑनलाईन

भोकर : येथील तालुका भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचा-यांच्या मनमानी कारभारास नागरिक वैतागून गेले असून विशेष म्हणजे कोणतेही काम अर्थिक व्यवहाराशिवाय पार पडत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

भोकर शहरातील भूमीअभिलेख कार्यालयाचा कारभार कार्यरत कर्मचा-यांच्या मनमानी प्रमाणे चालत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यरत कर्मचा-यांपैकी बहुतांश कर्मचारी नांदेडला वास्तव्याला राहून भोकरचे कार्यालय चालवत असल्याने कार्यालयात कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याचे निर्देशनास येत आहे. उपस्थित कर्मचारी कार्यालयीन कामासाठी जाणा-या नागरिकांना योग्य ती माहिती न देता टाळाटाळ करत हुसकावून लावत असल्याचे प्रकार घडत आहेत.

मोजणीच्या नावाखाली जवळपास सर्व कर्मचारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना कार्यालयात सतत चकरा माराव्या लागतात. शिवाय भ्रमणध्वनीवरुन संपर्क केल्यास फोन सुध्दा घेत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. गुंठेवारी, जमीनीची मोजणी, टोच नकाशे, वादविवादातील प्रकरण यासाठी सहा महिने ते वर्षे भर वाट पहात बसावी लागते. शिवाय येथील कार्यालयाचा गेली काही वर्षापासून अतिरिक्त पदभार असलेले अधिकारी हाकत असल्याने दोन-तीन तालुक्याचा कारभार पाहताना कनिष्ठ कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवण्यात अकार्यक्षम ठरत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या