22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडनांदेडात आर्ची आली; मोबाईल, पाकीट गायब झाले !

नांदेडात आर्ची आली; मोबाईल, पाकीट गायब झाले !

एकमत ऑनलाईन

नांदेड : मराठी सिनेमातील प्रसिध्द नायीका रिंकू राजगुरु या शनिवारी एका खाजगी प्रतिष्ठाणच्या उद्घाटनासाठी नांदेड शहरात दाखल झाल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली. यात अनेकांचे मोबाईल व पाकीट लंपास झाल्याची नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर ठाण्यात सुरु होती.

सिने तारका रिंकू राजगुरु या शहरात येणार असल्याची अनेक प्रसार माध्यमातुन प्रचार करण्यात आला होता. त्यांना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी शनिवार सकाळपासून मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रतिष्ठाणसमोर गर्दी केली होती. या गर्दीमुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली. कोरोना नियमांचा फज्जा उडाला. महापालिकेकडून कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले असून विनाकारण जनतेला वेठीस धरुण वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे अनेकांनी संतपा व्यक्त केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत निरुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, अनेकांचे मोबाईल काही जणांचे पॉकीट कार्यक्रमात गायब झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

रिकामे पाकीट, कागदपत्रे रस्त्यावर
शहरात नव्या शुभारंभ झालेल्या एका नामांकीत दुकानाच्या उद्घाटनासाठी मराठी सिने तारका तथा सैराट चित्रपटाची नायीका रींकु राजगुरू हीला बोलवण्यात आले होते. यावेळी तीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेत, अनेकांच्या पाकीट आणि मोबाईलवर हाथ साफ केला. चोरट्यांनी चोरलेले पाकीट, एटीएम यासह महत्वाचे कागदपत्रे शहरातील रस्त्यावर अस्थाव्यस्त अवस्थेत पडल्याचे अनेक ठिकाणी पाहयला मिळाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या