27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeनांदेडविठूरायाच्या दर्शनासाठी थेट गावातून पंढरपूरला जाण्याची व्यवस्था; कंधार आगाराची नवीन संकल्पना

विठूरायाच्या दर्शनासाठी थेट गावातून पंढरपूरला जाण्याची व्यवस्था; कंधार आगाराची नवीन संकल्पना

एकमत ऑनलाईन

कंधार : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग कंधार आगाराच्या वतीने यंदा लाडक्या विठू माऊलींच्या दर्शनासाठी थेट गावातून पंढरपूरला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी गावातील ४५ प्रवाशांचा समूह असेल तर थेट गावातून पंढरपूरला येणे व जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध व बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे अशी माहिती कंधार आगाराचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी माहिती दिली

मागील दोन वर्षा पासून कोरोना या संसर्गजन्य रोगापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रद्धास्थान विठुरायाच्या दर्शनापासून भाविकांना व यात्रेकरूंना दूर राहावे लागले दोन वर्षाच्या कालावधी नंतर भाविकांना विठुरा यांचे खुले दर्शन मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुद्धा यात्रेकरू व भाविकासाठी बसेसची व्यवस्था सुरु केली आहे. कंधार आगारातून 36 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. ४ जुलै ते १५ जुलै दरम्यान पंढरपूर यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पंढरपूर यात्रेतून महामंडळस मिळत असते.

कंधार आगाराने तर यात्रेकरू व भाविकासाठी ग्रुप तिथे पंढरपूर बस सेवा या नव्या उपक्रमाने केली आहे. गावातील व ग्राम पंचायत येथून ४५भाविकांचा ग्रुप पंढरपूर दर्शनासाठी जाण्यास तयार असेल तर त्या गावातूनच थेट भाविकांना घेऊन जाण्याची व्यवस्था आगाराच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी कंधार आगाराचे आगार प्रमुख अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेकरू व भाविकांच्या सुविधा यात्रे मध्ये आगाराचे उत्पन्न व भाविकांची सोई यासाठी बैठक घेण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या