19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeनांदेडभोकर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई

भोकर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई

एकमत ऑनलाईन

भोकर : भोकर तालुक्यात गेल्या ब-याच दिवसांपासून कृषी दुकानात युरिया खताची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकº्यांना वापस करण्यात येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तर काही दुकानदार इतर मिश्रखते घेतल्यानंतर ज्यादा दराने युरिया खताचा पुरवठा करीत असल्याचे चर्चिल्या जात आहे.

सध्या तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला असल्याने शेतातील पिके चांगली डवरु लागली आहेत.आता या पिकांना युरिया खताची अत्यंत गरज आहे.त्यामुळे युरिया खत घेण्यासाठी अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात भोकर येथे येत आहेत. पण येथील कृषी दुकानदार आमच्या दुकानात सध्या युरिया खतच नाही अशी बतावणी करून शेतक-याला हैराण करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तेव्हा ऐन मोसमात युरिया खताचा डोस पिकांना नाही मिळाला तर पिकाची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भीती शेतक-यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कितीही पैसे घ्या पण युरिया खत द्या अशी मागणी कृषी दुकानदाराकडे करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतक-यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक होण्याची दाट शक्यता भोकर शहरात निर्माण झाली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी मा.विठ्ठल गीते यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन विचारले असता त्यांनी सांगितले की येत्या दोन दिवसात युरिया खताची रँक भोकरला मिळणार आहे. सर्वच खत विक्री करणाº्या दुकानात युरिया खत मुबलक प्रमाणात मिळेल याची शेतकº्यांनी खात्री बाळगावी. तसेच कोणत्याही दुकानातून आगाऊ चे पैसे देऊन युरिया खताची खरेदी करू नये युरिया खताचा काळाबाजार कोणत्या दुकानात होत असेल तर त्वरित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा त्या दुकानदारावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Read More  जिल्ह्यात ५४ कोरोना पॉझिटिव्ह

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या