19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeनांदेडकृषी दुकानदारांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा

कृषी दुकानदारांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा:शेतक-यांना युरिया खताची सध्या अंत्यत गरज आहे़ मात्र नायगाव शहरातील व परिसरातील काही कृषी दुकानदार जानुनबुजुन कृत्रिम तुटवडा भासवून मनमानी भावाने युरियाची विक्री आहेत़यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़याबाबत तहसीलदार सुरेखा नांदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

नायगाव तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस चांगला झाला आहे. तसेच पावसाचे आगमनही चांगले झाले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने तालुक्यात शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. मात्र पेरलेल्या पिकांच्या वाढीसाठी लागणारे युरिया खतांचे जानुन बुजुन तुटवडा असल्याचे दाखवले जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या तालुक्यातील कृषीसेवा केंद्रांमधून पेरणीसाठी सोयाबीन बियाणे खरेदी केले परंतु ते उगवलेच नसल्याने शेतक-यांना दुबारा तिबारा पेरणी करावी लागले त्यांच्यातूनच बाहेर निघाले नसताना मात्र कृषीसेवा केंद्र युरिया खत दुकानांत असताना ही जानुन बुजुन तुटवडा असल्याचे दाखवून आपल्या मर्जीप्रमाणे चढ्या भावाने विकुन जास्त नफा कमावण्याचे काम करत आहेत त्याचा फटका शेतकºयांना बसत असून वेळेवर खत न मिळाल्यामुळे शेतीच्या पुढील उत्पन्नावर त्याचा परिमाण होतो.प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कृषी दुकानदारांना युरिया आणि इतर खतांचे तुटवडा न दाखवता योग्य भाव लावुन द्यावे व मनमानी दराने खत विक्री करणाºया दुकानांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी निवेदन नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांना अंतरगाव येथील माजी उपसरपंच संभाजी पाटील शिंदे ,शामराव व्यंकटराव पाटील तोडे, प्रभाकर मोतीराम पा. शिंदे महाराज साम्राज्य संघ तालुकाध्यक्ष नायगाव,ज्ञानेश्वर आनंदराव तोडे,सतीश शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

नायगाव शहरात व परिसरात युरिया खंताची चढ्या भावाने विक्री होत .नायगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पुढेच तालुका कृषी कार्यालय आहे मात्र येथील अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असुन संबंधित दुकानंदारांवर कृषी अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

Read More  रायगड जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या