27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडआर्य वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आर्य वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

हदगाव : आर्य वैश्य समाजाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दहावी परीक्षेमध्ये प्रणव शिरीष पोलावार याने ९८.२०% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला.

तसेच कु. ईश्वरी गजानन पद्दमावार तसेच बारावी मध्ये श्रेया धनंजय महाजन तर प्रथम वसंत पत्तेवार यांनी देखील चांगले गुण घेऊन यश संपादन केल्याबद्दल त्यांचे त्यांच्या पालकांचे हार घालून पेढा भरवून छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी आर्य वैश्य समाजातील प्रतिष्ठीत ज्येष्ठ व्यक्तिमत्व वसंतराव गंधेवार ,आर्य वैश्य महासभेचे प्रभाकर पत्तेवार, डॉक्टर संजय पलीकोडावार, माजी अध्यक्ष शिरीष मनाठकर,डॉ गोकुळ चक्करवार, डॉ.संतोष मामीडवार, सुनील व्यवहारे गौतम वाठोरे आदींनी शुभेच्छा दिल्या

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या