24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडपरीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. दिगंबर नेटके रुजू

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. दिगंबर नेटके रुजू

एकमत ऑनलाईन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी यापूर्वी डॉ. रवि सरोदे हे होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. आता त्यांच्या जागी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. दिगंबर मालोजी नेटके हे बुधवार दि. १८ मे रोजी संचालकपदी रुजू झाले आहेत.

डॉ. नेटके हे यापूर्वी १९९५ते २००६ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते स्टोअर किपर, सहा. अधीक्षक आणि अधीक्षक या पदावर सेवेत होते. त्यानंतर ते सहा. कुलसचिव पदावर औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये रुजूझाले होते. सध्या ते तेथील उपकुलसचिव पदावर कार्यरत होते. या दरम्यान ते दोन वर्षे प्रभारी परीक्षा नियंत्रक पदी होते. असा एकूण विद्यापीठ प्रशासनातील त्यांना २८ वर्षाचा अनुभव आहे.

या बरोबरच त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अनेक समित्यांमध्ये काम केले आहे. या त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्र-अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते यांच्यासह विद्यापीठातील संचालक, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या