18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडआशा व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदे समोर आंदोलन

आशा व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदे समोर आंदोलन

एकमत ऑनलाईन

नांदेड : सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने देश व्यापी योजना कर्मचा-यांच्या आंदोलनाच्या आवाहना नुसार जिल्हा परिषदेत चार तास घेराव आंदोलन करून स्थानिक मागण्या सोडवून घेण्यात यश मिळविले आहे. आंदोलनामध्ये दोन हजारा पेक्षाही जास्त आंदोलकांचा सहभाग घेतला होता.

आंदोलनाचे नेतृत्व आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले. मागील तीन वर्षापासून अनेक आंदोलनामध्ये सातत्याने मागण्या करूनही आरोग्य विभागातील अधिकारी दाद देत नसल्यामुळे आशा आक्रमक झाल्याने जि.प.च्या आरोग्य अधिका-यांनी स्थानिक मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये. गट प्रवर्तक ताईंच्या गणवेशाचा कलर बदलण्यात यावा. गट प्रवर्तक ताईंना सहा महिने प्रसूती रजा मंजूर करून दरम्यान काळात लागू असलेले सर्व मानधन देण्यात यावे.

गट प्रवर्तक ताईंना स्कुटीची व्यवस्था करावी. आशा व गट प्रवर्तक ताईंना नोकरीच्या काळात अपघाती मृत्यू झाल्यास रुपए पाच लाखा नुकसान भरपाई आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपए दोन लाख वारसांना देण्यात यावेत. यावेळी आशा ह्या आरोग्य विभागाचा कणा असून काही वैद्यकीय अधिकारी,परिचारीका व इतर कायम कर्मचारी आशांना प्रचंड त्रासदायक ठरत असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या असून आशा व गट प्रवर्तक ताईंना सहकार्य केले नाहीतर संघटना व्यक्तीगत कार्यालयीन माहिती काढून आरोग्य विभागातील अधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्यास मागेपुढे पहाणार नाही कारण अनेक वैद्यकिय अधिकारीच कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत परंतु स्वत: असहकार्य करीत असतील तर लाल बावट्याचा हिसका दाखवावाच लागेल असे मत कॉ.गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलन जरी असले तरी मुख्य अडचण जि.प. व मनपा येथील अधिका-यांची असून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पंधरवाड्यात झाली नाहीतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना थेट घेराव घालणार असल्याचे मत कॉ.उज्वला पडलवार यांनी व्यक्त केले. तसेच आशा ह्या ७४ प्रकारचे काम करतात व त्यांना हेड नुसार मोबदला बँक खात्यावर वर्ग केला जातो परंतु महापालिकेत मात्र मोठी तफावत दिसून येत आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी हे स्थानिक असल्यामुळे ते आशा प्रति अनुकूल नाहीत व त्यांना कोणत्या निकषावर पद बहाल केले याची चौकशी होणे अवश्यक आहे अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

आंदोलनात फेडरेशनच्या पदाधिकारी कॉ.शीलाताई ठाकूर,कॉ.वषार्ताई सांगडे, द्रोपदा पाटील तर घरेलू कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड,जिल्हा समिती सदस्य कॉ.मारोती केंद्रे,कॉ.जयराज गायकवाड,कॉ.शेख मगदूम पाशा, गजानन गायकवाड, कॉ.दतोपंत इंगळे, शेख रफीक आदींनी सहभाग नोंदविला व आंदोलन यशस्वी केले. शेकापचे जिल्हा अध्यक्ष कॉ.सुभाशिष कामेवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या