22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडआशांचे २५ पासून अमरण उपोषण

आशांचे २५ पासून अमरण उपोषण

एकमत ऑनलाईन

नांदेड : सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने मनपाच्या विरोधात अनेक आंदोलने केली. परंतु महत्त्वपूर्ण मागण्यांची पूर्तता झाली नाही.दिलेल्या आश्वासनाचा विसर ही पडला. यामुळे दि. २५ ऑक्टोबरपासून शहरातील सर्व आशा स्वयंसेविकांनी सीटूच्या नेतृत्वाखाली सामुहिक अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील ८० आशा दिनांक २४ ते २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीन दिवस अमरण उपोषणास बसल्या होत्या. तीन उपोषणार्थींची प्रकृती खालावल्यामूळे त्यांना सरकारी दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या कक्षात आशांचे शिष्टमंडळ व आरोग्य अभियानाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होऊन लेखी आश्वासन दिल्यामुळे ते उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले होते. तुटपूंज्या मानधनावर अर्थातच ३३ रुपए प्रती दिन माधनावर आशांना ५२ प्रकारचे काम करण्यास विविध अधिका-यांमार्फत आदेश दिले जातात. आशा ह्या शासकीय कर्मचारी नसल्यामुळे समाजात त्यांना कमी व बगरपगारी कर्मचारी म्हणून हिनविले जाते.त्यातच आता आशांना रात्री पाच ते नऊ वाजेपर्यंत काम करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले असून रात्रीचे काम करण्यास संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे.

कोविड काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करणा-या आशांना रात्रीच्या वेळेला कोणत्याही प्रकारचे काम लावण्यात येऊ नये असा निर्णय सीटू राज्य नेतृत्वाने घेतलेला आहे. आशांना मारहाण व शिविगाळ झाल्याचे अनेक गुन्हे शासनदरबारी नोंद असताना रात्रीच्या वेळा गल्लोगल्ली फिरून काम करण्याचे फर्मान सोडणे म्हणजे जाणीवपूर्वक महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्या सारखाच प्रकार आहे. मागील अनेक महिन्या पासून आशांना पगार नसल्यामुळे व पगार वाटपाच्या रकमेत अनियमितता झाली असल्याचा आरोप फेडरेशनचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी वरिष्ठांकडे करून विभागीय समिती मार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच सात वर्षार्पेक्षा जास्त कार्यकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असणा-या सर्व अधिका-यांवर,कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.बुधवारी मनपा कार्यालयात आशांच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक बोलावण्यात आली होती.तेथे काही कारणामुळे ती रद्द झाली.त्यामुळे प्रलंबित मागण्या तसेच नवीन उद्भवलेल्या मागण्या घेऊन सामूहिक अमरण उपोषण करण्याचा निर्णय सवार्नुमते घेण्यात आला.याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या स्वाक्षरीने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या