32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडहदगांव तालुक्यात ऊसतोड कामगारावर प्राणघातक हल्ला

हदगांव तालुक्यात ऊसतोड कामगारावर प्राणघातक हल्ला

एकमत ऑनलाईन

हदगाव : महाराष्ट्रत मागासवगीर्यांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होत असून दिवसेंदिवस गोरगरीबावर अत्याचार वाढतच आहेत लोहा येथील जातीयवाद्याचे प्रकरण ताजे असतांनाच हदगांव तालुक्यातील भानेगाव येथे कामानिमित्त आलेले मुळावा येथील ऊसतोड स्थलांतरित कामगार यांना गणेश जाधव यांनी अमानुष पणे मारहाण केली.

हदगांव तालुक्यातील भांनेगाव येथे परगावावरून आलेल्या इतर कामगार यांच्या झोपडयवर जाऊन अंधा-यारात्री मारहाण करत त्याच्या झोपडय पेटून देण्याच काम केले सविस्तर वृत्त असे की काही महिन्यापूर्वी ऊसतोड कामगार दत्ता सखाराम रंनखाम हे अत्यंत हलाखीची व परिस्थिती असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऊस तोडण्याचे काम करतात ते ऊसतोड कामगार असून त्यांनी आपला परिवार व इतर नातेवाईक सोबत घेऊन
कारखान्याच्या माध्यमातून हदगांव तालुक्यातील भानेगाव येथे आले सखाराम रंनखाब हे मुळ मूळवा येथील रहिवाशी आहेत.

त्याचा संबंध काही महिन्यापूर्वी गावातील गणेश जाधव ट्रॅक्टर मालक यांच्याशी आला परंतु गणेश जाधव हा जातीवादी असल्याने नेहमी जातीय भावानेतुन सखाराम रंनखाब यांना व त्याच्या परिवाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता परंतु आपण गोरगरीब आहोत याची जाण ठेवत सखाराम रंनखाब हे ऊसतोड कामगार असल्याने कधीच गणेश जाधव यांना अरे तुरे किंवा शिवीगाळ न करता प्रामाणिकपणे काम करत असत तरीपण गणेश जाधव त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच जातीवाचक शिवीगाळ करत असत जातीवाचक शिवीगाळ करत असतांना एके दिवशी सखाराम रंनखाब यांना व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली पोटाचा प्रश्न सुटण्यासाठी आलो आणि तुम्ही विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करत असे म्हणत असताना पूर्ण दिवस आधी गणेश जाधव यांनी महिला पुरुषांना अमानुषपणे मारहाण केली त्यावेळी सुद्धा ऊसतोड कामगार काहीच बोलले नाही.

आज रोजी सुद्धा पुन्हा २२ च्या पांडुरंग आले वाड यांच्या शेतात झोपडीवर असताना गणेश जाधव ट्रॅक्टर मालक यांनी सखाराम रंनखाब हे अंबाला कडे कच्च रस्त्याने जाते वेळस गणेश जाधव यांनी आपली स्वत:ची जिप थंबवत तूज्या सोबत चे माणसे घेऊन ये असे म्हुणुन जातीवाचक शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली यां बाबतीत रीतसर फिर्याद हदगांव पोलीस स्टेशनं ला दिली असता गणेश जाधव यांच्यावर सह अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसाचे, आठ मार्चला अर्थसंकल्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या