34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडलग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; तरूणाविरूध्द गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; तरूणाविरूध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर २८ फेब्रुवारी रोजी पहाटे बळीरामपूर येथील एका आरोपी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको वसाहतीशेजारील भीमवाडी येथील एका २३ वर्षीय तरूणीसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून बळीरामपूर येथील आरोपी तरूण नितीन केशव डोंगरे याने उपरोल्लेखित तरूणीला विश्वासात घेतले. दरम्यान, आरोपी नितीन डोंगरे याने गेल्या दोन वर्षांपासून उपरोक्त तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून त्या तरूणीवर वारंवार अत्याचार केला. विशेष म्हणजे, आरोपी नितीन डोंगरे एवढ्यावरच थांबला नसून, त्याने आपल्या पोटावर लाथाबुक्याने जबर मारहाण करुन आपणास गर्भपात करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे,अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस पो. कॉ. विश्वनाथ पवार यांनी दिली.

उपरोक्त आरोपी तरूणाने तु मला लग्न कर म्हणून जबरदस्ती करशील व पोलीस ठाण्याला गेलीस, तर तुला पिस्तोलने गोळ्या घालून खतम करतो, असे म्हणून आपणास जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजी नितीन केशवराव डोंगरे याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पो. नि. विश्वजीत कासले, पो.कॉ. शंकर बिरमवार व महिला पो. कॉ. रागिणी सूर्यवंशी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

..अखेर संजय राठोड यांचा राजीनामा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या