28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये एटीएसचा छापा; एकजण ताब्यात

नांदेडमध्ये एटीएसचा छापा; एकजण ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : देशभरात टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. नांदेडमध्येही देगलूर नाका भागात बुधवारी रात्री एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने छापा मारुन मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे.

मागच्या महिनाभरपूर्वीच नांदेड शहरात दिल्ली येथील एनआयएची पथक पहाटे तीन वाजता धडकले होते. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तिघांना ताब्यात घेऊन, त्यांची तब्बल बारा तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर आता बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री एनआयएच्या सूचनेवरून एटीएस पथक पुन्हा एकदा नांदेड शहरात दाखल झाले असून एटीएसच्या पथकाने देगलूर नाका भागात छापा मारुन पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेतले आहे.

अन्सारी याचे या भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. रात्रीपासून एटीएस कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे. एटीएसला त्याचे अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय आहेÞ त्याची कसून चौकशी सुरू असून एटीएसकडून गोपनीय पद्धतीने ही सर्व कारवाई करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या