21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडतामसा पोलिस ठाण्यावर हल्ला प्रकरण, २७ जणांना शिक्षा

तामसा पोलिस ठाण्यावर हल्ला प्रकरण, २७ जणांना शिक्षा

एकमत ऑनलाईन

नांदेड : चार वर्षापुर्वी घडलेल्या भिमाकोरेगाव घटनेनंतर आष्टी ता़ हदगाव येथे एका बालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर तामसा पोलिस ठाण्यावर जमावाने हल्ला करीत दगडफेक केली होती. या जमावातील २७ जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी पाच वर्ष सक्तमजुरी व विविध कलमानुसार प्रत्येकी ११ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यातील दोन फरार आरोपींना ही शिक्षा देण्यात आली आहे.

चार वर्षापुवी सन २०१८ मध्ये भीमाकोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. नांदेड जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटून आष्टी ता. हदगाव या गावात एका बालकाचा मृत्यू झाला होता. या संदर्भार्चे निवेदन देण्यासाठी काही मंडळी पोलिस ठाणे तामसा येथे गेली. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा हे होते. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.बी.गोमारे हे होते. निवेदन देण्यासाठी आलेल्या मंडळीला भिम टायगर सेनेचे अमोल रावळे यांनी उचकुन लावले. त्यावेळी तयार झालेल्या जमावाने पोलीसांविरुध्द घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्यावर प्रचंड दगडफेक केली.

या दगडफेकीत अनेक पोलीसांना किरकोळ मार लागला. पोलीस ठाण्याचे नुकसान झाले. तसेच एम.एच. २६ आर.४३५ या गाडीची जमावाने तोडफोड केली. याबाबतची तक्रार तामसा येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक रावसाहेब दिगंबर पवार यांनी दिली होती. यानूसार कलम ३५३, ३३२, १४८, १४३ सोबत सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदानुसार गुन्हा दाखल केला.

सुरूवातीला सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.बी.गोमोर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पुढे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल माने यांनी उर्वरीत तपास करून न्यायालयात २७ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेतील अमोल उत्तमराव रावळे, जयकिशन शेषराव रावळे, तानाजी उर्फ रवि विठ्ठलराव अचलखांब, रवि गणपत वाघमार, संदीप केरबा हनवते, आष्टदिप केरबा हनवते, धम्मविर पांडूरंग हनवते, नितीन मुकींदाराव जाधव, संदीप यशवंतराव जाधव, दिपक कोेंडीबा जाधव, नितीन चांदराव खंदारे, देवानंद यशवंत जाधव सर्व रा.तामसा ता.हदगाव, सुरेश गौतम शेळके, रविंद्र शामराव शेळके, विनोद प्रभु शेळकेरा.कंजारा ता.हदगाव, मारोती नामदेव तुपसाखरे, राजू जयवंता नारळे, मधुकर बालाजी नारळे, अनिल शंकर वाघमारे रा.दिग्रस ता.हदगाव, कचरु तुकाराम वाठोरे रा.लोहा ता.हदगाव, अक्षयकुमार प्रकाश नारळे रा.आंबेडकरनगर नांदेड, पांडूरंग गोविंद नरवाडे रा.लोहापाटी ता.हदगाव, संघपाल प्रभाकर कांबळे, प्रमोद बाबूराव वाठोरे रा.वडगाव खु ता.हदगाव, मिलिंद विजय कांबळ रा.वडगाव (बु) ता.हदगाव, रमेश पुरभा कदम, धम्मपाल मारोतराव कदम रा.शिवपुरी ता.हदगाव यांच्या विरूद्ध सत्र न्यायालयात हा खटला चालला.

या खटल्यात सहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी या २७ आरोपींना पोलीस ठाणे तामसावर हल्ला करण्यासाठी दोषी मानले. या पैकी दोन जण तारखांवर हजर नसल्याने अगोदरच त्यांच्याविरुध्द अटकवॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांनाही न्यायालयाने शिक्षा दिली. याबाबत त्यांना अटक करण्याचे वेगळे वॉरंट जारी होईल अशी माहिती या खटल्याचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रणजित देशमुख यांनी सांगीतले़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या