24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeनांदेडअट्टल चोरट्याला १३ दुचाकीसह केले जेरबंद

अट्टल चोरट्याला १३ दुचाकीसह केले जेरबंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीचा शोध घेण्याकामी भाग्यनगर पोलिसांनी डि.बी.च्या माध्यमातून पथक तयार केले आहे. या पथकाने रविवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून १३ दुचाकीसह एक आरोपीस ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून अन्य गुन्ह्यातील सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठ दिवसापुर्वी शहरात धाड देगलूर नाका भागात धाड टाकुन लाखो रूपयांचा दुचाकी चोरीतील सुट्ट्या भागाचा साठा जप्त केला आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच रविवारी भाग्यनगर पोलिसांच्या डि.बी.पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून गजानन व्यंकटी धुमाळ रा. सायाळ ता.नांदेड यास ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील जवळपास १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर आरोपींवर जिल्ह्यातील अनेक ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

डी.बी.पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरिक्षक आर.एस.जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. कळके, जायभाये, कांबळे, गर्दनमारे, कदम, झगडे यांनी सापळा रचून सदर आरोपीला जेरबंद केले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर आरोपीने अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरून आणल्या असल्याचे सांगीतले आहे. त्यात भाग्यनगर , मुदखेड, शिवाजीनगर व इतर ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या असल्याचे त्याने कबुल केले आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सोळंके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपीची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर आरोपीकडून आणखी मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

देवणी गोवंश जतन करण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांचे प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या