26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home नांदेड मांडवीच्या स्टेट बँकेत शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

मांडवीच्या स्टेट बँकेत शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मांडवी : किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळने यांनी मला व पत्नीला अनेक महिन्यापासून पीककर्ज देतनाही म्हणून अखेर मांडवीच्या स्टेट बँकेत चक्क फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या बाबत असे की अरुण लक्ष्मण आळणे व त्यांची पत्नी करुना अरुण आळणे यांचे कनकी शिवारात शेती आहे या शेतीवर दोघांनी पिककजार्साठी मांडवीच्या स्टेट बँकेकडे पिककजार्ची फाईल दिली अनेक महिने होऊन सुद्धा बँक पीककर्ज दिले नाही या कजार्साठी त्यांनी अनेकवेळा बँकेच्या पाय्-या झिजविला पण उपयोग झाला नाही

अखेर आज दुपारी अरुण आळणे बँकेत दोर घेऊन आले व फिल्ड ऑफिसरच्या टेबलवर चढून पंख्याला दोर बांधून फाशी घेण्याचा प्रयत्न केला उपस्थित पोलीस उपनीरीक्षक शिवप्रसाद कराळे , विजय कोळी ,बँकेचे सुरक्षा रक्षकांनी त्यांना उतरविल्याने पुढील अनर्थ टळला. या अचानक झालेल्या घटनेमुळे बँकेत उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी अवाक झाले.मागील महिन्यात अशाच प्रकारे बॅकेचे शाखाधिकारीच्या मनमानी कारभारला कंटाळून एका शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न केले होते.

कित्येक शेतकऱ्यांचे मागील पाच-सहा महिन्यांपासून पिकाकजार्साठी शेतक-यांना बॅकेचे खेटे मारावे लागत आहे कनेक्टिव्हिटीच्या नावावर बॅकेचे शाखाधिकारी टोलवाटोलवी करीत असून शेतक-यांना अरेरावीची भाषा वापरून उद्धट वागणूक दिले जात असल्याची शेतक-यांकडून बोलले जात आहे.

तिसरी कसोटी अनिर्णित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या