27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home नांदेड तहसील कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

तहसील कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : तालुक्यातील मौजे टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी न केल्यास बाबूराव समर्थ वामनराव पाटील वडगावकर यांनी तहसील कार्यालया समोर सर्व कर्मचारी यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर टाकुन आत्महदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्यामुळे जिवित हानी टळली पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्यांच्या जवळील आग पेटी घेऊन त्यांना ताब्यात घेतले पण हा विषय इथेच संपला नसुन जर का टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून जे यांच्याशी निगडित असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आत्मदहन करण-या नागरीकाने पोलिस प्रशासना समोर केली असे पंतप्रधान ग्राम स्वच्छता योजने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झा ला असल्याचे सांगून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी सततची मागणी करून सुद्धा पंचायत समिती प्रशासनाने परस्पर चौकशी करून अहवाल पंचायत समितीला सादर केला त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते वामनराव मिराशे पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर हातात पेट्रोल ची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पोलिसांनी मिराशे यांच्या वर प्रतिबंधात्मक कारवाई केली. स्वच्छाल्य योजनेत वामनराव मिराशे यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, तरीही त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. दुसरीकडे अधिकारी व संबंधित यंत्रणेने बोगस लाभार्थ्यांना स्वच्छाल्याचा लाभ मिळवून दिला. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागणीची दखल न घेतल्यास ११ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा वामनराव मिराशे यांनी दिला होता. त्यानुसार, त्यांनी आपल्यासोबत पेट्रोल कॅन घेवून तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूने तहसीलमध्ये प्रवेश केला. जय जवान जय किसान चा नारा देत स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी वामनराव मिराशे यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक लष्कर साहेब यांच्या अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शौचालय योजनेचा लाभ चुकीच्या लाभार्थींना दिला असेल तर त्याची सखोल चौकशी होईल. दोषी आढळणा-या ची गय केली जाणार नाही. असे तहसीलदार यांनी पत्रकार यांच्याशी संपर्क साधला असता म्हटले आहे

१३० वर्षांनंतर अमेरिकेत पहिल्यांदा मृत्यूदंडाची शिक्षा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या