23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडकारवाईसाठी शिवसैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारवाईसाठी शिवसैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत मौजे सवना (ज) ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहारात ग्रामसेवकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शिवसैनिक बालाजी अल्लेवाड यांनी दि.९ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यास ताब्यात घेतले यामुळे अनर्थ टळला.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना (ज) येथील गरमपंचायतीत कार्यरत असलेले आजी-माजी ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधितांनी सन २०१७ पासून स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत करण्यात आलेल्या अपहार प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. यास पंचायत समिती कार्यालयाचे आजी झ्र माजी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राजकीय वरहस्त असल्याने या प्रकरणातील दोषींना पाठिशी घालण्याचे काम केल्या जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मौजे सवना ज. येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेतून शौचालय प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे. यामधे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व रोजगार सेवक यांच्या नावावर परस्पर पैसे उचलून अफरातफर करण्यात आला म्हणून मौजे सवना ज. येथील शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी मागील काळात तहसील कार्यालयासमोर तीन दिवस आमरण उपोषण केले होते.

तेव्हा गटविकास अधिकारी सुहास कोरेगावकर यांनी स्वत: येथील प्रकरणाची चौकशी करून शौचालय प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या समोर उघड केले. परंतु अचानक त्यांची बदली झाल्यामुळे व मधल्या काळात कोरोणा महामारीमुळे हे प्रकरण जशास तसे थांबले होते. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयाकडून हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयास दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे पत्र देण्यात आले. मात्र या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाले असताना देखील हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाकडून मौजे सवना ज. येथील स्वच्छ भारत मिशन योजनेत भ्रष्टाचार करणा-या आरोपींना पाठीशी घातले जात होते.

सर्व प्रकारास अभय देणा-या या अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात मौजे सवना येथील शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत भ्रष्टाचार करणा-या आरोपींवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असे म्हणत दिनांक ९ जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर १२ वाजता अचानक उपस्थित होऊन अंगावर डिझेल टाकून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली, दरम्यान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी व शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आलेवाड याना तात्काळ ताब्यात घेऊन आत्मदहन करण्यापासून रोखले आहे. यावेळी गटविकास अधिकारी यांनी दि.१७ तारखेपर्यंत वेळ द्या वरिष्ठांचा अहवाल येताच पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिल्याने तात्पुरते आंदोलनास स्थगित करण्यात आलें.

कोरोनाने अनाथ झालेल्या मुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालय विनामुल्य मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या