अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा 15 सप्टेंबर चा रात्री चोरट्यांनी बँकेच्या वरच्या बाजूने असलेला दरवाज्याने आत प्रवेश करत बँकेचे आतील सेटर चे कुलूप तोडले व गेट तोडत असताना बँकेचे सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. सदर हल्लेखोर सीसीटीवी मध्ये कैद झाले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलीस स्थानकात सुरू होती.
घटनास्थळावर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, जमादार बोईनवाड, जमादार किशोर हुंडे , आदींची उपस्थिती होती. अधिकच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला कळवण्यात आले आहे. मागील काही काळा पासून मालेगाव परिसरात चोऱ्या चे प्रमाण वाढले आहे त्या मुळे अधिकचा बंदोबस्त देण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात!