25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडअपहरण करून बालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

अपहरण करून बालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

देगलूर : एका मित्राच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाने दुसर्‍या मित्राच्या अकरा वर्षीय बालकाचा अपहरण करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात देगलूर पोलिस ठाण्यातून दोन पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तब्बल बारा तासानंतर आरोपीच्या तावडीतून त्या बालकाचे सुटका करून घेतली त्यावेळेस तो जखमी अवस्थेत सापडला आहे.

मुखेड तालुक्यातील कोळनुरचे रहिवासी व सध्या देगलूर शहरातील साधना नगरात राहात असलेले अशोक विठ्ठलराव पाटील व याच गावातील हल्ली मुक्काम भक्तापुर रस्त्यावरील सुभाष नगर येथील शेषेराव बोईनवाड यांची दाट मैत्री होती. यामुळे या दोन्ही कुटुंबात आपसू कीचे चांगले संबंध होते बोईनवाड हा कुटुंब अनेक वषार्पासून मुंबईत वास्तव्यास होते दोन वषार्पासून ते देगलूर मध्ये राहायला आले शेषराव बोईनवाड यांचा पंचवीस वर्षे मुलगा महेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येते. दि.१५ एप्रिल रोजी गुरुवार या दिवशी अशोक पाटील यांचा अकरा वर्षीय ओम नावाचा मुलगा दुपारी दोन ते तीन दरम्यान स्वत:च्या घराच्या छत गच्चीवर आईचा मोबाईल फोन घेऊन खेळत होता.

त्यावेळेस महेश बोईनवाड ओमकार ला तुज्या वाढदिवसानिमित्त मिनी कार तुला गिफ्ट देतो असे सांगून आपल्या ईरटीका कार क्रमांक एम एच ४७ वाय ७८, ३७ या गाडीत बसून घेऊन गेला ही घटना घरातील कोणत्या व्यक्तीला माहित नव्हती थोड्यावेळानंतर अशोक पाटील हे घरी येऊन जेवण करते वेळेस होऊन कुठे आहे. असे त्यांनी पत्नीला विचारले फोन छतावर खेळत आहे, असे त्या म्हणाल्या नंतर त्या व मला बोलावण्यात गेल्या तेव्हा तो छतावर आढळून आला नाही गल्लीत व इतर ठिकाणी शोधा शोध घेऊन नातेवाईकाकडे चौकशी केली दरम्यान तो कोठेही आढळून आला नाही.

आणि मोबाइल बंद म्हणत आहे त्यामुळे संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान अशोक पाटील यांनी देगलूर पोलिस ठाणे गाठून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माज्या मुलास अज्ञात कारणासाठी पळून नेले अशी तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या वेळेस आरोपी महेश बोईनवाड हादेखील ठाण्यात अशोक पाटील यांच्यासोबत आला होता आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होता आरोपी हा महेश देगलूर शहरातील न्यायालयासमोर गाडी उभा करून आला होता त्यानंतर पीडित बालकास इतर घेऊन फिरला त्यानंतर मध्यरात्री देगलूरहून निघाला पहाटेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील बडूर येथे आला असता त्याच्या गाडीची डिझेल संपले त्यावेळेस अपहरणकरता महेश पिडि़त बालकाला गाडीत झोप तुज्या पप्पाचा फोन आल्यानंतर आपण घरी जाऊ असे सांगितले त्यानंतर पीडित बालक झोपला असे समजून महेश नाही. एक मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पिढीच बालक तात्काळ जागा झाला आणि दगड शिकण्याचा प्रयत्न करताना त्याच्या तोंडाला व डोक्यास मार लागून तो रक्तबंबाळ झाला आहे.

रेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अपहरण करता महेश हा एवढ्यावर न थांबता गाडीतील उशीने त्याचा गळा तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस तो पीडित बालक प्रत्युत्तर देत त्याच्या हाताचा चावा घेऊन आरडाओरड करत होता त्याने सुटकेसाठी धडपड केली याच वेळी बडूर येथील वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतात पाणी देऊन गावाकडे जात असताना त्यांच्या लक्षात या बालकाचे आवाज आल्याने त्या व्यक्तीने त्या बालकाकडे गेले असता त्या बालकाने सर्व हकीकत त्या इस्मा सांगून त्याच्याकडील मोबाईल घेऊन आपल्या वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र वडिलांचा फोन नॉटरिचेबल होता त्यानंतर सगरोळी येथील त्याचा मामा संजय पाटील यांना फोन लावला संजय पाटील यांनी तात्काळ बडूर येथील गावक-यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि महेशला संरक्षण देण्याची विनंती केली काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले त्या पीडित बालकावर बिलोली येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर देगलूर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सर्व हकीकत सांगितली त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे व इतर पोलिस कर्मचा-्यांना घटनास्थळाकडे पाठवून दिले.

देगलूर पोलीस ठाण्यातील दोन पथके रवाना
या थरारक घटनेतून पीडित बालकाने सुटका करून घेतल्यानंतर आरोपी हा स्पष्ट झाला असून त्याच्या शोधात देगलूर पोलिस ठाण्याचे जमादार व्यंकटेश आलेवाड, सुधाकर मलदोडे संजय यमलवाड यांचे एक पथक तर जमादार मोहन कंधारे, तलवारे, व पांचाळ यांचे एक पथक अशी दोन पथके पाठविण्यात आली आहेत तसेच आरोपीचा फोटोही सोशल मीडियावर ही वायरल केला कोणाच्या निदर्शनास हा आरोपी आढळून आल्यास देगलूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांनी सांगितले आहे मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारा या घटनेने अनेकांचे मन सुन्न झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या