29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडलॉकडाऊनच्या विरोधात वंचितकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न

लॉकडाऊनच्या विरोधात वंचितकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नांदेड: एप्रिल महिना हा भीम जयंती, रमजान मास प्रारंभ व पाडवा या तिन मोठ्या सण-उत्सवांचा महिना असून या तीन सण उत्सवाच्या काळामध्ये राज्य सरकारच्या ब्रेक द चैनच्या नावाखाली लावलेल्या लॉकडाऊन मुळे छोट्या व्यापा-यापासून मोठे उद्योगपती पर्यंत सर्वांवर अन्याय कारक ठरणार आहे त्यामुळे रविवारी सकाळी वंचित बहुजन समाज पार्टी च्या वतीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करीत असतात बंदोबस्तात असलेल्या पोलीसांनी कार्यकर्तेत्या ताब्यात घेतले.

जाचक अटी रद्द करून बाजारपेठ पुर्ववत चालू ठेवावी अन्यथा बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्यावतीने ११ एप्रिल रोजी नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व समविचारी संघटनांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता त्या मुळे आरटीआय चौकात पोलीसांनी कडक बंदोबस्त लावला होता.

नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्सला रेमडिसीव्हीर चे इंजेक्शन उपलब्ध करून विकण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून या इंजेक्शनची काळाबाजारी होणार नाही व सर्वत्र हा इंजेक्शन उपलब्ध होईल, तसेच नांदेड शहरातील पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्व गरजूंना साखर तेल सहित सर्व राशन किमान दोन महिन्याचे दजेर्दार राशन मोफत व घरोघरी कीट निहाय वाटप करण्यात यावे. कोवीड नियमांना अधीन राहून नांदेड शहरातील सलून दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच चहाच्या टप-या छोट्या-छोट्या हॉटेल रेस्टॉरंट यांनाही नियमाच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत.

उपरोक्त सर्व मागण्यांची गांभीर्यान दखल घेऊन येत्या दहा तारखेपर्यंत जर सदरील मागण्या मान्य झाले नाही तर ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्यावर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आयटीआय पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व व्यापारी संघटना व सामाजिक संघटना व इतर समविचारी पक्षांच्या मदतीने मोठे जनआंदोलनात्मक ब्रेक द लॉकडाऊनसाठी महामोर्चा काढण्यात येईल. निवेदन गोविंद दळवी फारुक अहमद डॉ. संघरत्न कु-हे, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले विठ्ठल गायकवाड अयुब खान साहेबराव बेळे, श्याम कांबळे, अ‍ॅड़ शेख बिलाल, उत्तम धर्मेक यांनी दिले होते पोलीसांनी कार्यकर्ते न ताब्यात घेतल्यामुळे आरटीआय चौकातील वाहतूक सुरळीत झाली

 

बोरी बसस्थानकासमोरील पाच दुकाने जळून खाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या