23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडचिमुकल्या बालीकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

चिमुकल्या बालीकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

माळाकोळी : लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील सात वर्षाच्या अल्पवयीन बालीकेवर गावातील ३५ वर्षाच्या तरुणाने बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देऊळगाव येथे २९ मे रोजी सायंकाळी घडला या प्रकरणी बालीकेच्या चुलत्यानी माळाकोळी ठाण्यात तक्रार दीली यावरुन सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपी ला ताब््यात घेतले आहे़
घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात यांनी तात्काळ देऊळगाव येथे भेट देऊन पीडित अल्पवयीन मुलीची चौकशी केली ़

कुटूंब प्रमुख हे दोन्ही भावंड मंदिराचे बांधकामावर मंजुरी करण्याचे काम करतात त्यामुळे ते कामानिमित्त बाहेर गावी गेले असता घरी आई पत्नी होते़
२९ मे रोजी गावात बसवेश्वर महाराज यांची जयंती होती सायंकाळी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आरोपी अमृत व्यंकटी सोनवळे यांच्या अ‍ॅटोवर बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा घेऊन सोबत होता

पुढे डी जे लावलेला आवाज होता ही मिरवणूक अल्पवयीन मुलीच्या घरासमोर आली असता पुढे डान्स सुरू असल्याने आटो उभा होता तेव्हा अल्पवयीन मुली गाडीत बसल्या मिरवणूक पुढे गेली यावेळी आरोपीने सात वर्षाच्या अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करून आटो मध्येच तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला डी जे चा आवाज असल्याने मुलीचे ओरडणे कळाले नाही़

सदरील पीडित मुलगी मिरवणूक संपल्यानंतर घरी आली आणि झोपली सकाळी ती उठल्यावर घाबरलेली दिसून आली तिला ताप आला असता तिच्या चुलतीने तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला मुलीची विचारपूस करून त्यांनी न्यायासाठी माळाकोळी ठाण्यात ३० मे रोजी पीडीत मुलीच्या चुलत्याने फीर्याद दीली ़ यावरुन पोलिसांनी पीडित सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला तात्काळ वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली़ तपासाची चक्रे फिरवून पहाटे तीन वाजता पोलिसांनी आरोपीला मस्की शिवारातील एका आखड्यावरुन ताब्यात घेतले

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी ३१ मे रोजी सकाळी देऊळगाव येथे भेट दिली ़याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीचे चुलते यांनी दिलेल्या फियार्दीवरून माळाकोळी ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-्या नराधम अमृत व्यंकटी सोनवळे वय ३६ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपीचा आटो टाटा म्याजिक ताब्यात घेतला आहे अबाधित आरोपी पूर्वी अनेक प्रकार केले आहेत अशी चर्चा ही सुरू आह

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या