21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडगुप्तधन काढण्याचा प्रयत्न; आठ जणांवर गुन्हा

गुप्तधन काढण्याचा प्रयत्न; आठ जणांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : गुप्तधन काढण्यासाठी वाका शिवारात दि.१२ जून रोजी मध्यरात्री जादुटोना करण्याच्या तयारीत असणा-या टोळीतील आठ जणांवर उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यातील दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर इतर आरोपींची पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा कायदा झालेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जादुटोना सारख्या अघोरीपणास काही जण बळी पडत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येतेक़धी कधी तर कोणाला जीवानिधी जावे लागते. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी शासन आणि सेवाभावी संस्थाकडून दरवर्षी अनेक जनजागत्तीचे कार्यक्रम घेतले जातात.यामुळे काही जण सुधारतात मात्र काहीच्या माथी काहीच पडत नसल्यामुळे अजूनही अमिषाला बळी पडत आहेत. पुन्हा अशीच एक घटना उस्माननगर पोलिस ठाणे हद्दीतील मौजा वाका येथे घडली आहे.शेतात काही तरी गुप्तधन मिळेल यासाठी जादुटोना करण्याची काहीनीं योजना आखली होती.

दि.१२ जूनच्या मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास योगेश बाळासाहेब हंबर्डे यांचे शेतात शिवानंद उर्फ गजानन मारोती कोमटवार रा. रावेर नायगाव त्याच्या सोबत तिरुपती नरवाडे, शंकर राठोड रा. कुष्णुर तांडा, धर्मा जाधव, वैशाली गायकवाड रा. पूर्णा व इतर ३ इसम गुप्तधन काढण्याचे काढण्यासाठी जादूटोणा करण्यासाठी लिंबू, हळद, कुंकू नारळ बाळगून गुप्त धन काढण्याची तयारी करीत होते.यावेळी पोलिसांनी यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम २०१३ चे कलम ३, अनुसूची ४ प्रमाणे उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .यातील आरोपी शिवानंद कोमटवार व तिरुपती नरवाडे यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहेग़ुप्तधनाच्या अमिषातून घडलेल्या याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहेक़ेवळ अमिषापोटी काही तरी गुप्तधन मिळेल असे समजून या टोळीने योजना आखली होती. परंतू काही नागरिक व पोलिसांच्या सर्तकतेमुळे जादुटोना करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीचा भांडाफोड झाला आहे.

नागपूरच्या राज पांडेचे अपहरण करून हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या