18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडफुलवळ शिवारातील एमआयडीसी उद्योगाच्या प्रतीक्षेत

फुलवळ शिवारातील एमआयडीसी उद्योगाच्या प्रतीक्षेत

एकमत ऑनलाईन

कंधार : तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. तरुणांच्या हातांना काम मिळण्यासाठी मोठा उद्योग व्यवसाय तालुक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज असताना राजकीय इच्छाशक्­तीचा अभाव आणि श्रेयवादाच्या राजकारणामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होत नाहीत.

हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे तब्बल 33 वर्षे झाली तरी तालुक्यातील फुलवळ शिवारातील एमआयडीसी उद्योगाच्या प्रतीक्षेतच असून बेरोजगार तरुणांमध्ये मोठी नाराजी आहे. राजकीय नेत्यांनी गट-तट विसरून तरुणांच्या हातांना काम देण्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष देऊन उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तालुक्यात औद्योगीकरण वाढावे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने १९८८ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम. आय. डी. सी.) ३३ वर्षापूर्वी फुलवळ येथे औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करुन एमआयडीसीची स्थापना करण्यात आली ११ हेक्टर जागेत ५० प्लॉट पाडण्यात आले.

सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. बोटावर मोजण्या इतके दोन ते तीनच उद्योग सोडले तर ३३ वर्षापासून दुसरा कोणताही उद्योजक या ठिकाणी उद्योग टाकण्यासाठी आला नाही व येथील राजकीय पुर्ढा­यांनी प्रयत्नही केला नाही. परिणामी तालुक्यातील तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या मेट्रोसिटीकडे धाव घेताना दिसत आहेत.

नकळत शिक्षणाची गंगोत्री शहरातून वाहत असली तरी त्याचा या तरुणांना काही एक फायदा होत नसल्याचे समजते एमआयडीसी परिसरात मुबलक पाण्याचा साठा आहे यासाठी प्रयत्न केला तर काहीही होऊ शकते पण ते ३३ वर्षापासून कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे तरी लोकप्रतिनिधी आजवर अनेक वर्षात तरुणांचा विचार न करता आपल्या अट्टाहासापोटी उद्योगधंद्याला या ठिकाणी येण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नसल्याचे दिसून आले आहे. कंधार तालुक्याचा विकास झाला तर यात वाईट काय? मात्र आजवर लोकप्रतिनिधीने असे का केले हा संशोधनाचा विषय आहे.

तालुक्यात वाडी तांड्यांची संख्या जास्त आहे दरवर्षी दहा हजाराच्या वर ऊस तोडणी साठी ऊसतोड मजूर स्थलांतर होतात एमआयडीसीच्या पायथ्याला मन्याड खोरे असल्यामुळे पाणीसाठा तीनही ऋतूत मुबलक असतो पण सत्याधारांनी आपले साम्राज्य कायम ठेवण्यासाठी कुठल्याही उद्योग धंद्याला येऊ दिले नसल्याचे आताही सुज्ञ नागरिक सांगतात.

गेल्या पाच वर्षापासून कंधार शहराचा विकास झाला नसल्याचे शहरवासी कडून बोलले जात आहे शहरातील रस्ते आणि इतर समस्या नगरपालिका सोडू शकली नाही तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवणार का? अशी तीव्र भावना ही व्यक्त होत आहे. आत्ता तरी सत्ताधारी राजकीय पुर्ढा­यांनी एमआयडीसी परिसरात कोणता तरी उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम द्यावे जेणेकरून तालुक्यातून दरवर्षी हजारो तरुण काम धंद्याच्या शोधात होणारे स्थलांतर थांबेल असा सूर निघत आहे.

नांदेड जिल्ह्यातील सुरुवातीच्या तालुक्यांपैकी कंधार तालुका होय हा तालुका भौगोलिक दृष्ट्या फारसा समृद्ध नाही कारण या भागातील जमीन खडकाळ व डोंगराळ आहे मन्याड नदी ही कंधार तालुक्यातील प्रमुख नदी आहे मन्याड नदीच्या किना-यावर वसलेली गावे व शेत जमीन मन्याड नदीमुळे सुजलाम सुफलाम झाली आहेत. प्राचीन इतिहासाचा वारसा सांगणारा कंधार तालुका असून तालुक्याच्या परिसरात विविध ऐतिहासिक स्थळे त्या काळातील मंदिर व मूर्ती शिल्प पाहावयास मिळतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या