30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडमाहूरचे पर्यटन संकुल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

माहूरचे पर्यटन संकुल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

एकमत ऑनलाईन

पाय-याची मोडतोड सुरु,संबंधितांचे दुर्लक्ष

माहूर : तीर्थक्षेत्र माहूर येथे यत्रिकांच्या सोयी साठी मागील पाच वर्ष पूर्वी रेणुका मंदिराच्या पायथ्याशी मातृतीर्थ तलावा परिसरात उभारण्यात आलेली साडे पाच कोटीची भव्य बिल्डिंग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुडखात पडली आहे.

तत्ककालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या काळात शिखर संस्थानची साडे आठ एक्कर जमीन हस्तांतर करून केंद्र सरकारच्या निधीतून साडे पाच कोटी रुपयां चा निधी खर्च करून पर्यटन संकुल बांधून भव्य दिव्य वास्तू माहूर तीर्थक्षेत्राला मागील ६ पूर्वी अर्पण केली होती.आज या देखण्या वास्तूत यात्रिकाऐवजी परिसरातील अनेक सैराट जोडपे लॉक डाऊन चा फायदा घेत जंगल मे मंगल करीत आहे.

माहूर तीर्थक्षेत्रावर आरंभशूर मंडळीची कमतरता नसून मागणी करतांना उच्चरवाणे कंठशोष केल्या जातो परंतु पूर्णत्वास गेल्यानंतर त्याबाबत पाठपुरावाच केल्या जात नाही. मातृतीर्थ परिसराकडे जाणाº्या निसर्गरम्य जागेत सदरील पर्यटक निवास बांधल्या गेले असून या ठिकाणी अद्यावत मिनी बस स्थानक, भव्य दिव्य वाहन तळ, सुसज्ज उपहारगृह, भव्य दरबार हॉल, व यात्रिक निवास बांधून सुद्धा सा.बा. विभाग, जिल्हा प्रशासन, हे बघ्याची भूमिका घेत असून कोट्यावधीची ही वास्तू उदघाटनापूर्वीच तहसहस झाल्यास नवल वाटावयाचे कारण नाही.

माहूर शहरात आजमितीस एकही संस्थानाने यात्रिक हितासाठी धर्मशाळा बांधण्याचे औदार्य दाखविले नसल्याने ही भव्य वस्तू भाविकांच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक होती. एवढेच नव्हे तर या देखण्या वास्तूत पाण्याचा टिपूस नसून या इमारती मधील शटर उघडून त्यास अनधिकृत पणे वास्तव्यस्थान बनविल्याची ही माहिती आहे.या कोट्यवधीच्या इमारती बाबत प्रशासनात इच्छाशक्तीचा अभाव असून कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही हेच सिद्ध होत आहे.माहूर विकासाबाबत बघ्याची भूमिका घेणाºया सर्व संबंधित यंत्रणा विरुद्ध अकार्यक्षमतेचा ठपका ठेऊन यासंबंधी जिल्ह्याचे पालकमंत्री आशोक चव्हाण यांनी लक्ष घालून दोषी विरुद्ध कार्यवाही करावी अशी रास्त अपेक्षा माहूर तीर्थक्षेत्रावर येणा-या भाविका सह शहरातील विकास प्रेमी नागरिकांनी केली आहे.

Read More  गलवान खो-यातील सैनिकांना विशेष पोशाखाची गरज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या