कंधार : येथील शासकीय धान्य गोदाम ची मागील अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती त्यामुळे पावसाळ्यात गोदामातील धान्यावर ताटपत्री टाकून धान्याची नासाडी थांबवण्याची वेळ कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती कित्येक टन नासाडी होत होती शासनाला अनेक वेळा पत्र व्यवहार करून अखेर येथील ५०० मॅट्रिक टन गोदामाचे दुरावस्था असलेले पाडून नवीन शासकीय धान्य गोदाम १८०० मेट्रिक टन क्षमतेचे बांधकाम मे २०२२ रोजी पूर्ण झाले असून आता तात्पुरत्या स्वरूपात असलेले पेठवडज येथील धान्य गोदाम नूतन गोदामात येण्यासाठी कोणाची प्रतीक्षा करावी लागत आहे हा कळायला मार्ग नाही यामुळे हे नूतन गोदाम कोट्यावधीचे असलेले आज येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी शो पीस म्हणून महसूल विभागाने ठेवले का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
बारूळ येथील शासकीय धान्य गोदामाची दुरवस्था झाली होती इथे चौपट क्षमतेचे नवीन गोदामाचे काम पूर्ण झाले आहे सध्या येथील अंतर्गत असलेले स्वस्त धान्य दुकानदारांसाठी तात्पुरती सोय म्हणून पेठवडज येथील दोन वर्षाच्या करारनामावर मारुती केंद्रे यांच्या ऑइल मिल पर्याय व्यवस्था महसूल विभागाने केली होती सध्या या असलेल्या ऑइल मिल गोदामा मध्ये घुस उंदीर सापाच्या सुळसुळाट झाला आहे यामुळे धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे.
ही नासाडी होत असलेली गोदाम पाल यांनी तहसीलदार यांनाही कळवली आहे तसेच येथील घूस उंदीर साप यापासून आमच्या जीविताला धोका असल्याची माहिती वरिष्ठांना येथील हमाल व येथील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिले होते नूतन गोदामाचे काम पूर्ण झाले याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी करून पेठवडज येथील पर्याय व्यवस्था असलेले गोदाम नूतन गोदामात स्थलांतर करावे असे सूचना तहसीलदार यांना दिले होते तसेच या गोदामातील हमालीचे काम करणारे माथाडी कामगार यांनीही तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी सदरचे गोदाम इथून बारूळ नूतन गोदामात येथे स्थलांतर करावे अन्यथा काम बंद आंदोलनाच्या निवेदन दिले आहे.
या गोदामातून ५० गावातील ६८ स्वस्त धान्याचे दुकान तसेच या योजनेअंतर्गत १७ हजार ७६५ कार्डधारकांच्या धान्याची नासाडी थांबावी यासाठी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला कळविले तरीपण अजूनही नूतन गोदामाचे प्रवेश करण्यासाठी कोणाची प्रतीक्षा करावी लागत आहे महसूल विभागांना हा कळायला काही मार्ग नाही.