26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडमाहूर तालुक्यात दमदार पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

माहूर तालुक्यात दमदार पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

एकमत ऑनलाईन

माहूर : जून महिना शेवटच्या टप्प्यात असताना तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली होती, यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतातुर होता,शनिवारी दुपारनंतर तालुका भरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला, आता या पावसामुळे पेरण्यांना गती मिळणार आहे.

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी जेमतेम कपाशीची लागवड केली आहे, परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी दमदार पाऊस न झाल्याने पेरण्या न करण्याचा निर्णय घेतला होता, तसे आवाहन कृषी विभागाकडून ही करण्यात आले होते, यामुळे शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळावे हा हेतू होता तो साध्य होत तालुक्यातील शेतकर्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

शनिवारी दुपारनंतर माहूर तालुक्यात बहुतांश गावांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला, माहूर तालुक्यातील वाई बाजार सहपरिसरात दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला, तसेच सायंकाळी ही पावसाने रिमझिम हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले होते, तर काही भागांमध्ये या पावसामुळे चिखल झाला होता,
तालुक्यात प्रामुख्याने कपाशी नंतर सोयाबीनला शेतकरी पसंती देतात यामुळे जोपर्यंत जमीन पूर्ण भिजत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरले जात नसल्याचे सांगण्यात आले.

खते खरेदीसाठी होणार गर्दी
जुन महिन्याची २५ तारीख झाली तरी पाऊस न आल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शनिवार दि.२५ रोजी झालेल्या पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी तसेच व्यापारी देखील सुखावले आहे. पाऊस नसल्याने बाजार पेठेतील खरेदी विक्रीची उलाढाल मंदावली होती. ही मरगळ दूर होऊन शेतकरी बियाणे तसेच खत खरेदी साठी बाजारात गर्दी करतील अशी आशा कृषी केंद्र दुकान चालकांनी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या