25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडवादळी वा-यामुळे केळीच्या बागा आडव्या !

वादळी वा-यामुळे केळीच्या बागा आडव्या !

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अर्धापूर तालुक्यात रविवारी सांयकाळी अचानक वादळी वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. शेतात हळद काढणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतक-यांची एकच धांदल उडाली. हळद शिजवून उन्हात वाळवणासाठी ठेवलेली हळद भिजली. तर फळबागासह उन्हाळी ज्वारी व इतर पिकांना मोठा फटका बसला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून केळीच्या बागांनाही वादळी वा-याचा फटका बसला असून सर्व पाने फाटली आहेत. तर लहान व आंबेगाव परिसरात काढणीस आलेल्या शेतक-यांच्या बागा आडव्या पडल्या आहेत.

अर्धापूर तालुक्यात मोठे बागायती क्षेत्र असल्यामुळे उन्हाळी ज्वारी, ऊस, भुईमूग पिकासह केळीचे पीक घेतले जाते. वादळी वा-यामुळे ज्वारी व ऊसाचे पीक आडवे पडली आहेत. तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून इसापूर व येलदरी धरणाचे मुबलक प्रमाणात पाणी आहे. यंदा केळीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. एकीकडे केळीचे क्षेत्र वाढत असताना मात्र गतवर्षी पासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे केळीच्या मार्केटला याचा मोठा फटका बसला. केळी उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यावर्षी तरी दिलासा मिळेल ही आशा बाळगून शेतक-यांनी उन्हाळी हंगामात केळीची लागवड केली होती. केळी काढणीस येणे आणि लॉकडाऊन लागणे यामुळे अगोदरच शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

अशातच रविवारी सायंकाळी पून्हा अस्मानी संकट शेतक-्यांच्या माथी आले. वादळीवा-यामुळे सर्वच भागातील केळीची पाने फाटली. तर लहान व आंबेगाव परीसरात काढणीस आलेल्या केळीच्या बागा आडव्या झाल्या. माज्याकडे पाच हजार केळीची लागवड असून शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. तरी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी नागोराव मुदखेडे यांनी केली आहे.

आत्मदहन प्रकरणी दोघांना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या