28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडकेळीचे भाव पडले ; शेतकरी अडचणीत

केळीचे भाव पडले ; शेतकरी अडचणीत

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अधार्पूर तालुक्यातील केळीचे भाव मोठ्या प्रमाणात पडले असून येथील बागायतदार शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने केळी उत्पादक शेतक-यांना प्रती एकर पन्नास हजार रुपयांची अर्थिक नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वगार्तून होत आहे. येथील केळी खरेदीसाठी पंजाब, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर येथील व्यापारी नियमित ये – जा करतात. त्यामुळे केळीला मोठी मागणी आणि मागणी प्रमाणे भावही दिला जातो. परंतु यंदा कोरोना संसर्ग आणि लाँकडाऊन यामुळे हे व्यापारी येथे येवू शकत नाहीत. परिणामी शेतक-यांच्या केळीचा व्यापारही थांबला आहे. त्यामुळे आजपर्यंत १ हजार ४०० रुपए प्रतिक्विंटल भाव असलेली केळी आज ५०० ते ६०० रुपए प्रती क्विंटल विकत आहे. यात शेतक-यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने केळी उत्पादक शेतक-यांना प्रति एकर ५० हजार रुपयांची अर्थीक मदत द्यावी. अशी मागणी बागायतदार शेतकरी वगार्तून होत आहे.

अधार्पूर तालुका तसा केळी उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. मात्र अधार्पूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतक-यांना योग्य भाव मिळत नसल्याने व कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने १५ एप्रिल पर्यंत संचार बंदी व लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. तसेच परप्रांतीय व्यापारी येथे येत नाहीत. त्यामुळे केळीची खरेदी विक्री व व्यापार बंद आहे. तर स्थानिक व्यापा-यांकडून केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-्यांचे अर्थकारण फिस्कटले आहे.

केळी उत्पादक शेतक-यांना गत काही महिन्यांपूर्वी १ हजार ४०० रुपए प्रति क्विंटल भाव मिळत होता. मात्र आज रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे निच्चांकी ६०० रुपए क्विंटल भाव मिळत असून केळी पिकाचा लावगड खर्च निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याचा गांभीयार्ने विचार करून महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना ५० हजार रुपये प्रती एकर मदत करावी. अशी मागणी शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे रमेश पाटील क्षीरसागर यांनी सरकारकडे केली आहे.

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांनी उभारली पक्षीपाणपोई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या