23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडबाप्पाच्या आगमनाची लागली चाहूल

बाप्पाच्या आगमनाची लागली चाहूल

एकमत ऑनलाईन

माहूर : कोरोनामुळे दोन वर्ष सर्व सण-उत्सववार निर्बंध होते, इच्छा असूनदेखील उत्सव साजरे करता आले नाहीत. उत्सवांवर मर्यादा होत्या. परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षांची मर्यादा लक्षात घेऊन यंदा दहीहंडी, गणेशोत्सव, उत्साहात साजरे करण्यासाठी सरकारने कोणत्याही सणांवर कसलेही निर्बंध नाही असे सांगून सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचे आवाहन केले.

त्यामुळे राज्यात यावर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असताना या उत्सवानिमित्त बापाच्या आगमनाची जोरदार तयारी माहूर शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात सुरू झाली असून गेल्या तीन-चार महिन्यांपासून बाप्पाच्या मूर्तीला आकार देऊन मूर्ती बनविण्याचे काम कारागीरामार्फत करण्यात येत आहे. मात्र आता बाप्पाच्या स्थापनेला थोडाच वेळ असल्याने कारागीराने युद्ध स्तरावर काम सुरू केले आहे. तर यावेळी गणेश मूर्तीचा आकार भव्य राहणार आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर आता सर्व काही व्यवस्थित झाले असताना इतर सण उत्सवाबरोबरच यावर्षी गणेशोत्सव देखील सर्वत्र मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा केल्या जाणार असल्याने या उत्सवाकडे भाविक भक्तांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे गणेश उत्सवानिमित्त होणा-या बापाच्या आगमनासाठी जयंत तयारी माहूर शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यात व तांड्या, वस्तीत सुरू झाली आहे. यावेळीचा गणेशोत्सव हा सार्वजनिक स्वरूपाबरोबरच खासगीरित्या घराघरातही मोठ्या उत्साहात व भव्यतेने साजरा केला जाणार असल्याने गणेश भक्तात आतापासूनच उत्साह संचारला आहे. यावर्षी बाप्पाची मूर्ती ही भव्य मोठी ही बनविल्या जात असून उंच व मोठ्या मूर्तीला चांगलीच मागणी असल्याची माहिती वाई बाजार येथील प्रसिध्द मुर्तीकार दत्ता पोरनवार यांनी आदर्श गावकरीला दिली आहे. त्यामुळे कारागीरही आकर्षक व मोठ्या आकाराच्या मूर्ती बनविण्याकडे लक्ष देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

येत्या ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन होणार असून, दहा दिवसपर्यंत मुक्कामी राहणा-या बापाच्या मूर्तीची स्थापना भाविक भक्तातर्फे ३१ ऑगस्टला मोठ्या उत्साहात केल्या जाणार असताना यावर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व लोकहीत उपयोगी कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यासाठी युवावर्ग हा पुढे सरकवत आहे. तर तशी तयारीही अनेका तर्फ केल्या जात आहे. त्यामुळे यावेळी गणेशोत्सव हा धार्मिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाद्वारे धुमधडाक्यात साजरा केल्या जाणार आहे व तशी तयारीही माहूर शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यात व तांड्या वस्तीत सुरू झाली असून कारागीर हे आपल्या कुटुंबासह गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला जोमाने भिडले असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या