29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडबॅरिकेट लावणे... गुत्तेदारांचे घर भरणे...!

बॅरिकेट लावणे… गुत्तेदारांचे घर भरणे…!

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभाग वेगवेगळ्या संकल्पना लढवून कोरोनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही प्रशासकीय बाबी लक्षात घेवून कार्यरत आहेत तर पोलिस विभाग मात्र शहराच्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट लावून कोरोनावर अंकुश बसू शकतो असा जावई शोध लावला आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झिकझॅक पद्धतीने बॅरिकेट लावण्यात आले आहेत. याचा फायदा कोरोनासाठी तर होणारच नाही. नांदेडकरांना मात्र याचा नाहक त्रास होत असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर बॅरिकेट लावणे… गुत्तेदारांचे घर भरणे असाच काही प्रकार असल्याचे उघडपणे बोलल्या जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शेकडोमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दृश्य नांदेडकर पाहत आहेत. राज्य शासन, जिल्हा प्रशासन रोज एक नवीन फतवा काढून लॉकडाऊ न करत आहे. लॉकडाऊ न कशाचे आहे कशासाठी आहे हेच कळायला मार्ग नाही. सकाळी ७ ते ११ नागरिकांना मुभा देण्यात आली. यावेळी कोरोना येत नसल्याचे जणूकाही प्रशासनाच्या कानात कोरोनाने सांगितले की काय असा सवाल समोर येत आहे. ११ नंतर कोरोना शहरात दाखल होणार असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर फिरु नये असे आवाहन करण्यात येत आहे. काही वर्षापुर्वी ‘शोले’नावाचा हिंदी चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. त्यात ‘गब्बरसिंग आयेगा… जल्दी सो जा..’ असा डायलॉग फेमस झाला होता.

तसाच काही प्रकार ११ के बाद कोरोना आनेवाला है घर मे बैठ जा असे जिल्हा प्रशासन सांगत आहे. परंतु कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी वैद्यकीय सेवेत वाढ मात्र केली न जाता शहरातील आयटीआय चौक, वर्कशॉप कॉर्नर या ठिकणची वाहतूक थांबवण्यात येत आहे. लेबर कॉलनी मार्गे तसेच वर्कशॉपला कैलाशनगर मार्गे वाहतूक वळवण्यात येत आहे. हा प्रकार कशासाठी समजतच नाही. वाहतूक वळवल्याने वेळ, पेट्रोल व गल्लीतील रस्त्यावर प्रदुर्षन होते. उलट मुख्य मार्गाने वाहतूक गेली तर सर्वांना सोईचे आहे. वाहतूक अडवून मार्ग बदलून कोरोनावर अंकुश ठेवता येऊ शकतो का असा सवाल नांदेडकर विचारत आहे. नागरिकांना त्रास देणे हा एकमेव हेतू आहे का. वस्तीतून ट्रॉफिक वळविल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढावी अशी इच्छा प्रशासनाची आहे का.. शहरातील रस्ते मोठे आहेत.

मुख्य रस्त्यावरील गर्दी टाळता येते. गल्लीबोळात तवस्ती असल्याने, रस्ते अरुंद असल्याने गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. बॅरिकेट लावण्याचे लॉझिक काय आहे असा सवाल केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर बॅरिकेटमुळे सकाळी अंम्बुलन्स अडचणीत आली होती. शेवटी नागरिकांनी पुढाकार घेवून अ‍ॅम्बुलन्सला रस्ता मोकळा करुन दिला. झिकझॅक बॅरिकेटमुळे अनेक ठिकाणी किरकोळ अपघात घडत आहेत. पालकमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष घातल्यास निश्चीतच बॅरिकेट लावण्याचे प्रमुख कारण समोर येईल, असे नागरिकातून बोलल्या जात आहे. गतवर्षी अशाच प्रकारचे बॅरिकेट लावण्यात आले होते. त्याचे देयक अद्यापही संबंधीत ठेकेदाराला मिळाले नसल्याची ओरड होत आहे. यंदा पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्यात आले असून पुर्वीचे देयक अदा करुन भविष्यातील बील उधारीवर ठेवून गुत्तेदाराचे घर भरण्याच काम प्रशासन करत असल्याचे आरोप उघड होत आहेत.

राफेलचे भूत बाटलीबाहेर!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या