19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeनांदेडसावध रहा, काळजी घ्या अन्यथा लॉकडाऊन वाढवावे लागेल : राठोड

सावध रहा, काळजी घ्या अन्यथा लॉकडाऊन वाढवावे लागेल : राठोड

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : हिमायतनगर शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे मागील काही दिवसांपासून तालुक्यातील सरम म,धानोरा, बोरगडी,चीचोर्डी,सह आदी गावात कोरोना ने शिरकाव केल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज घडीला 16 वर पोहोचली आहे त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला लॉक डाऊन वाढवावे लागेल असे आव्हान नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले आहे.

तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंन दिवस वाढत चालली आहे सध्याच्या अवस्थेत 16 च्या वर गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली असली तरी दैंनदीन बाजारपेठेत मात्र गर्दी कायम दिसत आहे त्यामुळे हिमायतनगर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी जनतेस आव्हान केले आहे की तालुक्यातील व शहरातील आजारी लोकांपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करा आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच राहा, रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका.

रुमाल कपडे वरचेवर बदला,आपला परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या समोर कोणी आल्यास मात्र नाक-तोंड झाकून घ्या.आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही याची जबाबदारी आपणच घ्या आन्यथा येणारा काळ खूप अवघड आहे कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत सद्या आपला तालुका सुरक्षित आहे पण येणारा काळ कसा आहे ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे सावध रहा काळजी घ्या अन्यथा आपल्याला हिमायतनगर शहरातील लॉक डाऊन वाढवावे लागेल असे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

वाढत्या वीज बिला विरोधात पंढरपूरकर आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या