23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडजागेच्या कारणावरून लाथा बुक्यांनी मारहाण

जागेच्या कारणावरून लाथा बुक्यांनी मारहाण

एकमत ऑनलाईन

हदगाव : तालुक्यातील भाटेगाव येथील फिर्यादी हे आपल्या प्लँट वर गाई ला चारा टाकण्यासाठी गेले असताना आरोपी कमलबाई गंगाधर शिंदे गायत्री गजानन शिंदे, गंगाधर दिगंबर शिंदे, गजानन शिंदे सर्व भाटेगाव यांनी सगमत करून फिर्यादिस थापड बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली प्रकरणी वरील आरोपीवर हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की भाटेगाव येथील रहिवासी मंगलबाई साहेबराव शिंदे यांनी गट नंबर १६ मधील साडे तीन गुंठे बालाजी शिंदे यांच्या पासून आठ महिन्यांपूर्वी विकत घेतली होती आणि ती जागा ग्रामपंचायत नमुना नंबर आठ ला लावली आता तो स्वताच्या मालकीचा प्लॅट असल्याने राहायला गेले असताना आरोपी वरील सर्वजण हा प्लँट माझा आहे माझ्या प्लँट मध्ये येऊ नको आलास तर जीव मारतो अशी धमकी दिली व फिर्यादिस मारहाण केली प्लँट हे फिर्यादीच्या कागदपत्री नावचा असून प्लँट व आरोपी अतिक्रमण करीत आहे

तरी पोलिसांनी अतिक्रमण करीत असल्यावर कडक कारवाई करण्यात यावी व आमचा असेलेला प्लँट अधिकृत देण्यात यावा असे हदगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या जबावात नमूत करण्यात आले आहे फिर्यादीच्या जबाबावरून वरील सर्व आरोपीवर कलम भारतीय दंड संहिता ३२३.५०४.५०६.३४.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या आदेशावरून पोलीस चिंतले करीत आहेत

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या