24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडशेतकरी कुटुंबीयास मारहाण ; सात जणावर गून्हा

शेतकरी कुटुंबीयास मारहाण ; सात जणावर गून्हा

एकमत ऑनलाईन

हदगाव : शेतीच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. यात एका शेतक री कुटूंबाला शेतात जावुन काहिंनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन, या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणा-या सात जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवशंकर औंकारगिर गिरी यांची वडीलोपार्जीत जमीन सर्वे न. १०३ ही हडसणी शिवरात असून त्याचा उदरनीर्वाह त्याच कुंटुंबावर आहे. परंतू हडसणी ता. हदगाव येथील काही धनाडे लोकाचा डोळा जमीनीवर असल्याने गोसावी समाजचे एकच कुंटुंब असल्या कारणाने २००८ पासुन त्याच्यावर कोणताना कोणता हल्ला किंवा आघात होताना दिसून येतो. या प्रकरणी आज पर्यत शिवशंकर गिरी यांनी ३ हजारापेक्षा जास्त अर्ज न्यायव्यवस्थेच्या हेतुने कार्यालयास देऊ केले आहे. याही उपरान्त मराठी समाजातील ७ व्यक्ती नी शिवशंकर औकारगिर गिरी यांच्यावर अचानक हल्ला केला असल्याने ते मृत्युशी झुंज देत आहेत.

त्यांच्या फियार्दीवरून हदगाव पोलिस स्टेशन येथे गून्हा नोदवण्या आला आहे. प्रथम खबर अहवालानुसार प्राप्त झालेली माहिती अशी की, सर्वे नं. १०३ ही शिवशंकर औकांरगिर गिरी यांची वर्डील उपार्जीत जमीन असून ती हडसणी शिवारामध्ये ८ हैक्टर ३० आरवर बागायती करतात. १०३ च्या सातबाराव १९६० पासून पंजोबा, अजोबा तर १९९१ पासून स्वत: शिवशंकर औकारगिर गिरी यांचे नाव वहिती रक्काण्यात आजगत आहे. परंतु एकटा गोसावी असल्याचे ध्यानात घेऊन दि. १२ ऑक्टोबर २०२१ चे सकाळी १० चे सुमारास शिवशंकर गिरी हे शेतात काम करत असताना संभाजी सुर्यवंशी, कैलास सुर्यवंशी, माधवराव सुर्यवंशी, शेषेराव सुर्यवंशी, तुकाराम सुर्यवंशी, राजू आत्माराम सुर्यवंशी, गणेश यादवराव सुर्यवंशी यांनी सगनमत करून जातीय शिवीगाळ करून लाकडाने , थापड बुक्याने मारहाण करून खत्म करून टाकण्याचे बोलला. शिवाय त्यांच्या सोबत असलेल्या राहूल गिरी यांना देखिल मारहाण केली. अशा मजकूरावरून हदगाव पोलिस स्टेशन येथे गून्हा नोदवण्यात आला आहे.

सातत्याने १०७ च्या कलामाचे व १४९ च्या नोटीसचे उल्लंघन: या प्रकरणाच्या अनूसंघाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून फीयार्दी शिवशंकर औकांरगिरी संबंधित सर्वे न. १०३ मध्ये दुसरी वेळेस प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्या कुंटुंबातील राहूल गिरी यांच्या वर चाकुने हल्ला तर त्याच्याच कुंटुंबातील महिला प्रतिभा गिरी यांची छेडछाड केली आहे. या प्रकरणात पोलिस स्टेशन हदगाव यांच्याकडून १४९ नोटीस तसेच तहसिल कार्यालयातून १०७ च्या अनुषंगाने आपआपसात भांडणे करू नका म्हणून पायबंद केलेले आहे. परंतु फीयार्दीकडून कायदयाचे पालन होत असताना हडसणी येथील अरोपीकडून वेळोवळी कायदा पायदळी तुडवीला जात आहे. हे सर्व रेकार्ड निहाय असताना अरोपी मात्र समाजात कायदयाची खिल्ली उडवताना दिसून येत आहे. त्यामूळे शिवशंकर गिरी यांनीच कायदा पाळावा का ? असा ही प्रश्‍न सद्याच्या वरील प्रथम अहवाल यांतुन दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या