23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडएस.टी.चालकाला मारहाण; एकजण ताब्यात

एस.टी.चालकाला मारहाण; एकजण ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : महाराणा प्रताप चौकाजवळ एस.टी.बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण करणा-या एकाला विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बसचालक साईनाथ बाबूराव किरतवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ३० जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्यासुमारास ते एस.टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.३९९५ चालवत असताना नमस्कार चौक ते महाराणा प्रताप चौक दरम्यान चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.०४ जी.डी.२१३६ च्या कार चालकाने त्यांची एस.टी.बस अडवून त्यांना शिवीगाळ केली, तसेच थापडबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी बसचालक साईनाथ किरतवाड यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी गुरनं २२३/२०२२ नुसार गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार लोखंडे यांच्याकडे तपास देण्यात आला. विमानतळ पोलिसांनी चार चाकी गाडीचा मालक खुशाल माधवराव जाधव (वय ५२) बजरंग कॉलनी नांदेड यास ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या