Tuesday, October 3, 2023

महापालिका आयुक्तांना वृत्तपत्र विके्रत्यांचा घेराव

नांदेड: वृतपत्र विक्रेत्यांना दंड लावण्याची धमकी देणा‍ºया मनपाच्या अधिकारी, कर्मचा‍ºयांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या पुढाकाराने सोमवारी मनपासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ.सुनील लहाने यांचे वाहन अडवून घेराव घालण्यात आला़ मात्र मला होम क्वारंटाईन होण्याचा आदेश आहे, असे सांगत आयुक्त निघून गेले.

सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना काहीशी मुभा दिली आहे. त्यानुसार सिडकोतील ढवळे कॉर्नर भागात एक वृत्तपत्र विक्रेता काम करीत असताना मनपाच्या पथकातील सदस्यांनी त्याला धमकावले आणि तुला पाच हजार, दोन हजार रुपये दंड लावतो असे सुनावले होते याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेते मनपा मुख्यालयसमोर सोमवारी सकाळी निदर्शने केली. याचवेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने व सहकारी कारमध्ये बसून बाहेर जात असताना त्यांची कार अडवून बालाजी पवार यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात विविध मागण्या असून त्यात प्रामुख्याने वृत्तपत्र विक्रेत्याला धमकावणार्‍या सिडकोतील मनपा पथकावर कारवाई करा, वृत्तपत्र विक्रेत्यांना राज्य व केंद्र सरकारची आरोग्य योजना लागू करा, स्वतंत्र वृतपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करुन मंडळ कार्यान्वित करावे आदि योजना ताबडतोब लागू कराव्यात, गटई कामगाराप्रमाणे मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत, शासकीय घरकुल योजनेत वृतपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, वृतपत्र विक्री व्यवसायास अत्यावश्यक असणारे साहित्य द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता.

या आंदोलनात राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार, गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ, सरदारसिंह चौहान, अवधूत सावळे,बाबू जल्देवार,संदीप कटकमवार, भागवत गायकवाड, नीळकंठ सोनटक्के, प्रवीण कुलकर्णी, शेख शुकुर मियाँ, गजानन पवार, शुभम पवार, रमेश वंगलवार, गणेश रत्नपारखे, महेश जाधव, विठ्ठल फडेवार, प्रशांत कुलकर्णी, दत्ता हांगरगे, गोविंद कंधारे, कृष्णा उमरीकर आदी सहभागी झाले होते.

Read More  पालावरील भटक्यांना मिळणार हक्काचे राशन

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या