32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड खबरदार! अफवा पसरवाल तर थेट कारवाई :डॉ. विपीन

खबरदार! अफवा पसरवाल तर थेट कारवाई :डॉ. विपीन

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या काही दिवसात कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहेक़ोरोनाच्या अनुषंगाने पुन्हा लॉकडाऊन होणार आहे,असे संदेश सोशल मिडीयावरून व्हायरल होत आहेत.परंतू हे संदेश पुर्णत: चुकीचे असून अशा अफवा पसरविल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिला आहे.

पहिल्या टप्प्यातील कोरोनाची लाट पुर्णपणे कमी झाली नाही.तोच कोरोना बाधितांची यंख्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे.अकोला,अमरावती व यवतमाळ जिल्हयात कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी लॉकडाऊ न सारखे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.वाढती संख्या निश्चितच चिंताजनक बाब बनली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातही लॉकडाऊ न लागणार असे संदेश, बातम्या, सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत. या बाबीची जिल्हाधिका-यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुभार्वाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे.

नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २00५ मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रीनकार्डच्या संख्येवरील मर्यादा अमेरिका काढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या