22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडटाळ, मृदंगासह वारक-यांचे भजन आंदोलन

टाळ, मृदंगासह वारक-यांचे भजन आंदोलन

एकमत ऑनलाईन

नांदेड : पंढरपूरच्या माऊलीची आराधना करणारे वारकरी हे अत्यंत शिस्तबध्द आणि काटेकोर भक्त ओळखले जातात.मात्र यंदाच्या पंढरपूर वारीसाठी शासनाने मर्यादीत परवानगी दिली आहे. या भुमिकेचा आज २१ जून रोजी अनेक वारक-यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात करित जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध केला.कोरोनाची लाट कमी झाल्यामुळे शासनाने काही जिल्हे अनलॉक केले आहेत.तर काही कार्यक्रमांना परवानगी दिली आहे.

यास अनुसरून यंदाच्या पंढरपूर वारीसाठी शासनाने मर्यादीत परवानगी दिली आह.े मात्र वारकरी यामुळे नाराज झाले आहेत. आज दि.२१ रोजी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष माऊलीच्या वारीसाठी त्यात खंडपडू देणार नाही, माझी पायी वारी माझी जबाबदारी खंडीत होऊ देणार नाही या विषयाला अनुसरून अनेक वारक-यांनी भजन आंदोलन करून शासनाच्या भुमिकेचा निषेध केला. आमच्या वारीमध्ये खंड होऊ देणार नाही शासनाच्या नियमाला मानन्यास तयार आहोत आम्हाला वारीची परवानगी मिळावी.

श्रीक्षेत्र पंढरपूर, श्री विठ्ठल आणि रुक्मीणी मातेचे मंदिर हे वारकरी भक्तांच्या दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या भजन आंदोलनात विविध वारकरी मंडळांतर्फे त्यांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय भागवत धर्म सभेचे ह.भ.प.अरविंद महाराज, संत तुकाराम महाराज संस्थान सोनखेड, पायी दिंडीचे ज्ञानोबा महाराज, प्रभु पाथरडकर, देविदास लाठकर, उत्तम कदम, अर्जुन महाराज, गजानन महाराज, बालाजी महाराज, लक्ष्मण पाटील, वसंत पानपट्टे, प्रल्हाद बापूराव यन्नावार, प्रकाश महाराज डांगे, मारोती महाराज जागापूरे, बालाजी महाराज कदम आदी भक्तमंडळी या भजन आंदोलनात सहभागी झाली होती.

आशा वर्कर्सचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या