29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडभाऊ साहेबांचा घातपात फसला.. अन् डॉक्टर वाचला

भाऊ साहेबांचा घातपात फसला.. अन् डॉक्टर वाचला

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असतांना नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याची सेवा करण्यासाठी जिल्ह्यातून अनेक डॉक्टरांना ग्रामीण भागातील रुग्णालयात सेवा करण्यासाठी शासनामार्फत पाचारण करण्यात येत आहे. डॉक्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत काम करत असतांना कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला आपण हळू बोला इतर रुग्णांना त्रास होत आहे असे वक्तव्य करताच रुग्णाचा नातेवाईक असलेला भाऊ साहेब गायकवाडचा राग अनावर झाला अन् त्याने चक्क चाकू काढून डॉक्टरावर हल्ला केला. तेथील नागरिकांनी वेळीच दखल घेतल्यामुळे डॉक्टराचे प्राण वाचले त्यामुळे असे बोलल्या जात आहे की, भाऊ साहेबांचा घातपात फसला अन् डॉक्टर वाचला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुग्णाच्या नातेवाईकांना क्षुल्लक कारणावरुन डॉक्टरावर चाकूचा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने मुखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डात काल रात्री ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला. कोरोना वार्डात मोठ्याने बोलू नका म्हटल्यावर रुग्णाच्या नातेवाईचा राग अनावर झाला आणि थेट चाकू घेवून डॉक्टरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेथील नागरिकांनी आरोपीचा हात धरुन चाकू काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपी भाऊ साहेब गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस मुखेड पोलिसांनी अटक केली आहे.

सदरील घटना अत्यंत गंभीर असून यासंदर्भात संबंधीत आरोपीला कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे. जिल्ह्यातत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दरदिवशी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन आपल्या जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहत्ो. तरीही काही गुंडवृत्तीचे नागरिक डॉक्टरांना दोष देत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. वेळीच अशा घटनांवर अंकुश बसला नाही तर भविष्यात वैद्यकीय सेवेत काम करणारे वैद्यकीय अधिका-यांनी हात काढून घेतले तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाऊ साहेब गायकवाडसारखी वृत्ती असणा-या नागरिकास वेळीच ठेचणे योग्य असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहेत. वैद्यकीय सेवा करणारे आणि पोलिस कर्मचारी यांच्या भावनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण वाचविण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करणा-या सर्व अधिकारी, कर्मचा-यांना सहकार्य करणे हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितल्या जात आहे.

संपूर्ण महाराष्‍ट्रावर हा आघात,दुर्घटनेची उच्चस्‍तरीय चौकशी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या