21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडभुमिपूत्र मुकुंद सरसर कर्नलपदी

भुमिपूत्र मुकुंद सरसर कर्नलपदी

एकमत ऑनलाईन

नांदेड : शौय पदक विजेते,नांदेड शहराच्या होळी भागात राहणारे भुमिपूत्र मुकुंद सरसर नुकतेच कर्नलपदी विराजमान झाले आहेत.सध्या ते अहमदनगर येथे कार्यरत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सरसर यांच्या कर्तृत्वाने नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नांदेड शहरातील होळी भागात राहणारे व नुकतेच कर्नलपदी विराजमान झालेले मुकुंद माधवराव सरसर यांच्या पदोन्नतीमुळे नांदेडचे नाव देशपातळीवर कोरल्या गेले. नांदेड भूषण कर्नल मुकुंद सरसर यांनी जम्मू काश्मीर येथे १९९७ मध्ये पाकिस्तानी आतंकवादी युध्दात फार मोठी असाधारण कामगिरी केली.

यामध्ये भारतीय सैन्यांचे प्राण वाचवून १० ते १२ आतंकवादी याना कंठस्नान घातले. या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना सन १९९८ मध्ये शौर्य पदक देऊन गौरविले होते. राष्ट्रपतीद्वारे त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील एकमेव सैन्य अधिकारी कर्नल पदापर्यंत गेले आहेत. त्यांचे शिक्षण महात्मा गांधी मिशन नांदेड येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी सीडीएस परीक्षाद्वारे सैन्य अधिकारी पदाची परिक्षा दिली. अत्यंत कठीण असलेल्या या परिक्षेत ते पहिल्याच प्रयत्नात उतिर्ण झाले आणि अधिकारी झाले. सध्या कर्नल मुकुंद सरसर हे अहमदनगर येथे ईएमई या कोरमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पदोन्नतीबद्धल नांदेडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कमलाकर शेटे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील युवक व युवतीनी देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे. कठोर व शिस्तप्रिय खात्यात देशसेवा करताना जो आनंद व मान- सन्मान मिळतो तो आपले जीवन नक्कीच उज्वल करतो. तरुणांनी आपले स्किल, जिद्द व फोकस डेव्हलप केल्यास सैन्य भरतीत सहज प्रवेश करता येतो. सैन्य भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे. आपल्या मातीला जपत देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे असे आवाहन नांदेडचे भुमिपुत्र तथा शौर्य पदक विजेते कर्नल मुकुंद सरसर यांनी बोलतांना केले.

नागपूरच्या राज पांडेचे अपहरण करून हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या