21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeनांदेडबिलोलीत आक्रोष मोर्चा : बंदला शंभर टक्के प्रतिसाद

बिलोलीत आक्रोष मोर्चा : बंदला शंभर टक्के प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

बिलोली : बिलोलीत बुधवारी झालेल्या हत्याकांडा संदर्भात आज सर्व पक्षिया कडुन आक्रोश मोर्चा काढण्यात आला,संपुर्ण बिलोली शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यात मांतग समाज, बौद्ध समाजासह मुस्लिम बांधव, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, वंचित आघाडीचा समावेश होता. शहराच्या झोपडपट्टी भागात राहणा-या मतीमंद मुलीवर बलात्कार करुन तीचा निर्दयीपणे खुन करण्यात आला होता या बाबतीत संपुर्ण जिल्हात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हत्याकांडा बाबतीत शेजारीच राहणा-्या एका तरुणास अटक ही करण्यात आली. पण समाज बांधवानी यावर समाधान नसुन त्या आरोपी सोबत अजुन कोन्ही साथीदार आहे काय याचा ही शोध पोलीसानी घ्यावा,यासाठी हा मोर्चा साठे नगरा पासुन ते गांधी चौका पर्यत काढून तहसिल समोर निदर्शने करुन शोकसभा घेतली.व तहसिलदाराला आ.रावसाहेब अंतापुरकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

मोचार्साठी तालुका,जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काना कोप-यातुन विविध संघटणेचे पदाधिकारी आले होते.या निवेदणात आरोपीची नार्को टेस्ट करा,या प्रकरणाची सि.बि.आय.मार्फत चौकशी करा,घरातील व्यक्तीना शासकीय नौकरीत समावेश करा या सह आदी मागण्या मागण्यात आल्या या मोच्यार्साठी आ.रावसाहेब अंतापुरकर,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे,सामाजीक कार्यकर्ते उत्तमराव जेठे,लोक स्वराज्य आंदोलणाचे नेते प्रा.रामचंद्र भंराडे,भाजप दलीत आघाडीचे प्रांत अध्यक्ष मारोती वाडेकर,उस्मानाबादच्या लहुजी विद्रोही सेनेच्या संस्थापक अध्यक्षा अँड पुजा देडे,भाजपाचे जिल्हा चिटणीस आनंद पा.बिराजदार तालुका अध्यक्ष श्रीनिवास पा.नरवाडे,शांतेश्वर पा.लघुळकर,काँग्रेस चे ता.अ.शिवाजी पा.पाचपिंपळीकर, राष्टवादीचे ता.अ.नागनाथ पा.सावळीकर, प.स.सदस्य संभाजी शेळके,भाजप युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रियंका खांडेकर,अनु.जा.मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी इंगळे,महीला आघाडीच्या शिवकन्या सुरकुटलावार, सुलोचना स्वामी, मिराताई संगनोर, हेमा चौधरी, मयुरी फुलारी, स्वरुपा शेवाळे, वलियोदिन फारुकी, धम्मदिप गावंडे यांची उपस्थिती होती.

‘त्या’ नराधमास फाशी द्या
बिलोली येथे घडलेल्या घटनेचा जिल्ह्यातून विविध संघटनेने, राजकीय पक्षाने तीव्र निषेध केला असून त्या नराधमास फाशी द्याही अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

महागाईला ‘इंधन’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या